• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 November 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवे सखी प्रभाग संघाची कृषी अवजारे बँक सुरू

by Manoj Bavdhankar
November 26, 2026
in Guhagar
35 0
0
Sakhi Prabhag Sangha’s Agricultural Implements Bank
69
SHARES
197
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महेश नाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन; महिला सक्षमीकरणाला बळ

गुहागर, ता. 26 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील पडवे सखी प्रभाग संघाने स्थापन केलेल्या कृषी अवजारे बँकेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांची विशेष उपस्थिती होती. Sakhi Prabhag Sangha’s Agricultural Implements Bank

ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक स्वावलंबन वाढविणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे, या उद्देशाने उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पडवे सखी प्रभाग संघाने कृषी अवजारे बँकेची निर्मिती केली आहे. Sakhi Prabhag Sangha’s Agricultural Implements Bank

या बँकेमध्ये विविध ग्रामसंघांच्या माध्यमातून कृषी अवजारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गोळेवाडी येथील भूमी ग्रामसंघाकडून पॉवर टिलर, इलेक्ट्रिक पंप, ग्रास कटर, लाकूड कटर, फवारणी पंप व राईस मिल; समता ग्रामसंघाकडून पावसाळी गवत काढण्याचे मशीन; भातगाव येथील भावना ग्रामसंघाकडून ग्रास कटर; विरंगणा ग्रामसंघाकडून कृषी अवजारे; पाचेरी आगर येथील ग्रामसंघाकडून पॉवर टिलर; जांभारी येथील सावित्री ग्रामसंघाकडून ग्रास कटर व कटर मशीन; शिवणे येथील प्रेरणा ग्रामसंघाकडून कोकम मशीन; तर कुंडली येथील जागृती ग्रामसंघाकडून पेट्रोल पंप, ग्रास कटर, फवारणी पंप, पाईप व हॉर्नी पंप अशा विविध साहित्याचा समावेश आहे. Sakhi Prabhag Sangha’s Agricultural Implements Bank

या उपक्रमाचे नाटेकर, पोळेकर आणि सुर्वे यांनी कौतुक करून प्रभाग संघातील महिला भगिनींचे अभिनंदन केले. कृषी अवजारे बँकेची स्थापना करणे ही महत्त्वाची बाब असली, तरी तिचे योग्य व्यवस्थापन करून ग्रामसंघातील महिलांना त्यातून नियमित रोजगार मिळेल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच ही अवजारे चालविण्यासाठी महिलांनी आवश्यक कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रभाग संघातील महिला बचत गट सदस्यांना भविष्यात आवश्यक असणारे सहकार्य जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही देतानाच उमेद अभियानाचा उपयोग महिलांनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. Sakhi Prabhag Sangha’s Agricultural Implements Bank

आबलोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश बाईक यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुहागर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय मोहिते, मायको कंपोस्ट पुणेचे कौस्तुभ येद्रे, विनोद सुर्वे, आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, प्रभाग संघाच्या अध्यक्षा नाजिमा दाभोळकर, सचिव सुनीता शेट्ये, प्रभाग संघ समन्वयक रूपाली पवार, सुनिधी मोहिते, विद्या धनावडे, स्मिता शिलधनकर, भक्ती साळवी, सिमरन नाचरे, रेखा जाधव, सुचिता कटनाक, निर्जला तटकरे, आकांक्षा जाधव, विशाखा नाटुस्कर, वेदिका पालशेतकर, मनस्वी मोहिते, सुदिक्षा डिंगणकर, सुप्रिया हुमणे, चैतनी शेटे, मीनल कदम, आसावरी आलीम, प्रकृती करमरकर, वैदेही माटल यांच्यासह विविध ग्रामसंघांचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sakhi Prabhag Sangha’s Agricultural Implements Bank

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSakhi Prabhag Sangha’s Agricultural Implements Bankटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet17
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.