गुहागर, ता. 24 : सध्या पावसाचे अनियमित प्रमाण आणि भविष्यात उद्भवू शकणारी दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, गुहागर शहरातील संभाव्य पाणीटंचाईबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळीच प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर शहराध्यक्ष अभिजित हेमंत रायकर यांनी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन सादर करून शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि पाणीपातळीची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. MNS aggressive regarding water supply
या निवेदनामध्ये शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत, सध्याचा पाणीसाठा, विविध प्रभागांमधील पाणीपुरवठ्याची स्थिती, उपलब्ध पाणीसाठा किती दिवस पुरू शकतो, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पाणीपातळीतील घट अथवा वाढ, तसेच शहरातील पाण्यावर आधारित सार्वजनिक व खासगी उद्योगधंद्यांची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास नगरपंचायतीकडून करण्यात येणारे नियोजन, पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि शासनाकडे प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. MNS aggressive regarding water supply
गुहागरकरांना उद्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने आजच नियोजन करावे! पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य संकट ओळखून आतापासूनच ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका मनसेने मांडली. MNS aggressive regarding water supply
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, मनसे तालुका सचिव प्रशांत साटले, पडवे गटाचे उपतालुकाध्यक्ष सचिन गडदे आणि प्रसिद्धी माध्यम प्रमुख प्रीतम सुर्वे उपस्थित होते. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच ठामपणे आवाज उठवत राहणार असून, गुहागर शहराच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. MNS aggressive regarding water supply
