गुहागर, ता. 14 : चिपळूण सावर्डे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतले असून, तिच्यासोबत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या संशयित व्यक्तीलाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागासह सावर्डे व चिपळूण पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक व आभार व्यक्त केले. Search for minor girl in Sawarde
सदर प्रकरणाची नोंद होऊन तीन दिवस उलटूनही मुलीचा शोध लागला नसल्याने सावर्डे परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंता व अस्वस्थता निर्माण झाली होती. दिवाळीच्या सणकाळात गेल्या चार दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभाग, सावर्डे पोलीस ठाणे तसेच चिपळूण पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करून अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. Search for minor girl in Sawarde
पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त करताना, पुढील तपासही तितक्याच गांभीर्याने पूर्ण करून प्रकरणातील वस्तुस्थिती कायदेशीररीत्या समोर आणावी आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई व्हावी, अशी व्यक्त करण्यात आली आहे. Search for minor girl in Sawarde