• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 November 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिवाळी सुट्टीत गुहागरात पर्यटकांची तुफान गर्दी

by Manoj Bavdhankar
November 13, 2026
in Guhagar
16 0
0
Huge crowds of tourists in Guhagar
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : पर्यटन केंद्रबिंदू म्हणून पुढे येत असलेल्या गुहागरात दिवाळीत पडलेल्या सुट्ट्यामुळे पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. शहरातील राहण्याची व्यवस्था फुल्ल झाली असून नागरिकांनी आपल्या घरांमध्ये असलेल्या पर्यटकांची सोय केली आहे. Huge crowds of tourists in Guhagar

महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा हा गुहागर तालुक्यात आहे. अथांग सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे गुहागरचे प्रमुख आकर्षण आहे. गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनारा तब्बल सात किलोमीटर लांब आहे. तालुक्यातील गुहागर, पालशेत, अडूर – बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ हे गुहागरमधील समुद्र किनारे आहेत. यापैकी बहुतांश समुद्र किनारे हे पर्यटकांपासून अलिप्त आहेत. यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. इथल्या शांत, निवांत समुद्र किनाऱ्यावर फिरताना लाटांचा आवाज कानात घुमतो. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून मन हरखून जाते. Huge crowds of tourists in Guhagar

Huge crowds of tourists in Guhagar

तालुक्यात अनेक धार्मिक पर्यटनस्थळ देखील आहेत.  व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत आहे. दशभूज गणेशाचे मंदिर देखील तितकेच लोकप्रिय आहे. या दोन्ही मंदिरात रात्री उशिरापर्यंत पर्यटक दर्शनासाठी होते. तालुक्यात पर्यटन हंगामात दिवसाला मोठया संख्येने पर्यटक येत असतात. Huge crowds of tourists in Guhagar

Huge crowds of tourists in Guhagar

निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतो. गुहागर चौपाटीवर समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर गर्दी केलेली दिसतं आहे. त्यातच गुहागर समुद्रकिनाऱ्याला  आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाल्याने पर्यटकांचा ओघ आणखी वाढलेला दिसतं आहे. वाढलेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन समुद्रात आंघोळ करताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक आणि गुहागर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, होमगार्ड ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’ घेऊन तैनात आहेत. Huge crowds of tourists in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsHuge crowds of tourists in GuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.