• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 November 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोस्ट विभागामार्फत घरबसल्या मिळणार डिजिटल हयातीचा दाखला

by Mayuresh Patnakar
November 12, 2026
in Maharashtra
22 0
0
Special drive by the Postal Department
42
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम सुरू; पेन्शनधारकांसाठी दिलासादायक उपक्रम

रत्नागिरी, ता. 12 : भारतीय डाक विभाग, इंडिया पोस्ट पेमेंट्स् बँक (IPPB) आणि केंद्र सरकारच्या पेन्शन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पेन्शनधारकांसाठी ‘नेशनवाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (DLC) कॅम्पेन ५.०’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पेन्शनधारकांना आता घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) काढता येणार आहे. ही विशेष मोहीम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये सुरू राहणार असल्याची माहिती विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश एस. कुलकर्णी यांनी दिली आहे. Special drive by the Postal Department

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँकांमध्ये जावे लागत असे. वाढते वय, लांबच लांब रांगा आणि तासनतास प्रतीक्षा यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पोस्ट विभागाच्या या डिजिटल सुविधेमुळे पेन्शनधारकांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा त्रास वाचणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Special drive by the Postal Department

या विशेष सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये

 * पेन्शनधारक आपल्या नजीकच्या पोस्टमनला घरी बोलावून किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काही मिनिटांतच ऑनलाइन पद्धतीने आपला हयातीचा दाखला सादर करू शकतात.
 * अनेकदा वृद्धापकाळामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) स्पष्ट उमटत नाहीत, परिणामी दाखला काढताना तांत्रिक अडचणी येतात. ही समस्या सोडवण्यासाठी या प्रणालीत ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा ओळख पडताळणी) चा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे बायोमेट्रिकमध्ये अडचण येणाऱ्या पेन्शनधारकांची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विनाअडथळा पूर्ण होणार आहे. Special drive by the Postal Department

तरी जिल्ह्यातील सर्व केंद्र व राज्य शासकीय तसेच इतर पात्र पेन्शनधारकांनी बँकांमधील गर्दी टाळून या घरपोच सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि ३० नोव्हेंबरपूर्वी आपला हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ज्ञानेश एस. कुलकर्णी यांनी केले आहे. Special drive by the Postal Department

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSpecial drive by the Postal Departmentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.