• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 November 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बनावट नोटांचा वापर करून सोन्याच्या चेन लंपास

by Mayuresh Patnakar
November 11, 2026
in Ratnagiri
16 0
0
Gold chain scam using fake notes
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 :  खेड येथे बनावट चलनी नोटांचा वापर करून सराफी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन चेन घेऊन दोन अज्ञात भामटे पसार झाल्याची धक्कादायक घटना मुंबई-गोवा महामार्गालगत लोटे-घाणेखूंट येथे घडली आहे. Gold chain scam using fake notes

सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) दुपारी सुमारे पावणेएकच्या सुमारास सोनल ज्वेलर्स या सराफी दुकानात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. सोनगाव-माठवाडी (ता. खेड) येथील संतोष आदावडे यांच्या मालकीचे लोटे-घाणेखूंट येथे सोनल ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. घटनेच्या वेळी संतोष आदावडे आणि त्यांचा भाचा दुकानात उपस्थित होते. याचदरम्यान दोन अनोळखी तरुण ग्राहक असल्याचे भासवून दुकानात आले. त्यांनी सोन्याच्या चेन खरेदी करायच्या असल्याचे सांगितले. त्यामुळे दुकानदाराने त्यांना विविध डिझाइनच्या सोन्याच्या चेन दाखवण्यास सुरुवात केली. Gold chain scam using fake notes

चेन पाहत असताना आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुकानदाराचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका तरुणाने दाखवलेल्या चेनपैकी एक चेन आपल्या मित्राला दाखवून येतो, असे सांगत दुकानाबाहेर जाण्याचा बहाणा केला. काही वेळानंतर तो दुसऱ्या साथीदारासह पुन्हा दुकानात आला. त्यानंतर दोघांनी दोन सोन्याच्या चेन खरेदी करण्याचे निश्चित केल्याचे दुकानदाराला सांगितले. Gold chain scam using fake notes

दोघांनी आपल्याकडील कॅरीबॅगमधून पाचशे रुपयांच्या नोटांची सहा बंडले काढली आणि ती दुकानाच्या काउंटरवर ठेवली. या बंडलांमध्ये एकूण तीन लाख रुपये असल्याचे त्यांनी संतोष आदावडे यांना सांगितले. पैसे दुकानातच ठेवून आपण सोन्याच्या चेन मित्रांना दाखवून पुन्हा येतो, असे सांगत त्यांनी दुकानदाराचा विश्वास संपादन केला. आरोपींनी पैसे काउंटरवर ठेवल्यामुळे व्यवहार पूर्ण होणार असल्याचा दुकानदाराचा समज झाला. त्यामुळे त्यांनी दोघांना चेन घेऊन बाहेर जाण्यास संमती दिली. मात्र, आरोपींचा हेतू खरेदी करण्याचा नसून फसवणूक करण्याचा असल्याचे काही क्षणांतच स्पष्ट झाले. दोघांनीही दोन सोन्याच्या चेन सोबत घेत दुकानातून बाहेर पडत तेथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे. Gold chain scam using fake notes

Tags: Gold chain scam using fake notesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.