21 गावातील 207 कुटुंबांमध्ये लुटला दिवाळीचा आनंद
गुहागर, ता. 10 : सलग तिसऱ्यावर्षी जनतेच्या सहभागातून खरेदी केलेला फराळ 11 अनुलोम मित्रांच्या मदतीने 120 कुटुंबापर्यंत पोचविण्यात आला. 4 कातकरी पाड्यांवर फराळ बैठकांचे आयोजन करण्यात आले. तसेच गुहागर डेपोमध्ये दिवाळीच्या आदल्या दिवशी निवासाला आलेल्या चालक वाहकांना दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नानाच्या व्यवस्थेसह फराळ देण्यात आला. Anulom_Faral

समाजाप्रती असलेले कर्तव्य आणि विविध समाजांमध्ये बंधुभावाचे नाते दृढ करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अनुलोमच्या वतीने गेली तीन वर्ष चला दिवाळीचा आनंद लुटू या या उपक्रमाचे आयोजन केले जाते. अनुलोमचे कार्यकर्ते आपल्या परिसरातील अशा व्यक्तींची नावे सुनिश्चित करतात ज्यांच्याकडे फराळ बनविला जाऊ शकत नाही. साधारणपणे दसऱ्यापर्यंत एक ढोबळ संख्या समोर येते. मग अनुलोमच्या कार्यकर्त्यांकडून चला दिवाळीचा आनंद लुटूया असे आवाहन करणारा संदेश व्हॉटसॲपवर फिरवला जातो. जे या विषयासाठी आर्थिक साह्य करु इच्छीतात त्यांना सर्वप्रथम व्हॉटसॲप ग्रुपवर सहभागी करुन घेतले. एका कार्यकर्त्याच्या खात्यावर जीपेद्वारे देणगी स्विकारण्याची व्यवस्था केली जाते. प्रत्येकाच्या देणगीची नोंद व्हॉटसग्रुपवर होत रहाते. तसेच ज्यांच्याकडून फराळ घेतला जातो त्याला त्याच जीपेवरुन पैसे पाठवले जातात. त्याची माहिती देखील ग्रुपवर पाठवली जाते. या जमा खर्चाचा हिशोब याच ग्रुपमधील एक व्यक्ती स्वत:हून पहाते. त्यामुळे संपूर्ण व्यवहार पारदर्शक पध्दतीने होतो. यावर्षी या उपक्रमासाठी 90 व्यक्तींकडून 76 हजार 700 रुपयांची देणगी जमा झाली. Anulom_Faral

भाग जनसेवक ज्ञानेश्र्वर शिंदे, आणि अनुलोम मित्रांनी खऱ्या अर्थाने गरज असलेल्या कुटुंबाची नावे निश्चित केली. यामध्ये कर्ता पुरूष गेल्यानंतर कोणी विचारतच नाही अशी कुटुंबे, गावात एकटेपणाने जीवन व्यतित करणारे, वृध्दापकाळत व्याधींनी त्रस्त असलेले आजी आजोबा, दिव्यांग कुटुंब, अशा विविध कुटुंबाचा समावेश होता. मिळालेल्या देणगीतून प्रत्येक कुटुंबासाठी पाव किलो चिवडा, पाव किलो शंकरपाळे, पाव किलो चकली, ५ करंजी व ५ लाडू असा फराळ देण्यात आला. 120 कुटुंबाना अनुलोम मित्रांनी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींबरोबर घरी जावून फराळ दिला. Anulom_Faral

पाड्यावरच्या दिवाळीने समस्यांवर चर्चा
अनुलोमचे काही कार्यकर्ते मुख्य समाजापासून दूर रहाणाऱ्या पाड्यांवर गेले. तेथे सामुहिक फराळ करताना गप्पांना सुरवात झाली. यामधुन या मंडळींच्या अनेक समस्या कार्यकर्त्यांनी जाणून घेतल्या. यामध्ये जातीचे प्रमाणपत्र नसणे, रेशनकार्ड नसणे, जन्मदाखला मिळत नाही, असा वैयक्तिक समस्या, एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त्र मुलावर उपचार करण्याबाबत असेलले अज्ञान, व्यावसायिक – सामाजिक अडचणी आदी समस्यांचा अंतर्भाव होता. या समस्यांपैकी काही समस्या आम्ही सोडवून देवू असे आश्र्वासनही अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिले. Anulom_Faral

गुहागर डेपोत दिवाळी
गुहागर आगारात दररोज संध्याकाळी 5 गाड्यांचे चालक वाहक निवासाला असतात. या चालक वाहकांना दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नानासाठी गरम पाणी, उटणे, तेल तसेच दत्त मंदिरात फराळाची व्यवस्था करण्यात आली. ही व्यवस्था एस.टी. डेपोतील कर्मचारी व अनुलोम मित्र मंदार कदम यांनी केली. या व्यवस्थेमुळे आम्ही बाहेर असूनदेखील आम्हाला दिवाळी साजरी करता आली. अशा भावना या चालकवाहकांनी व्यक्त केली. Anulom_Faral

फराळाच्या निमित्ताने बंधुत्वाचा संदेश
या संपूर्ण उपक्रमाचे संचालन अनुलोमचे उपविभाग जनसेवक मयूरेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या उपक्रमामागचा भाव सांगताना मयूरेश पाटणकर म्हणाले की, या उपक्रमात अनुलोमचे कार्यकर्ते हे निमित्तमात्र आहेत. आम्ही ज्या मंडळींना फराळ दिला या मंडळींची काळजी त्या वाडीतील ग्रामस्थ घेतच असतात. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात आजुबाजुची मंडळी त्यांना मदत करत असतात. अशा ग्रामस्थांच्या सोबत आम्ही आहोत. याची माहीती यानिमित्ताने होते. पाड्यांवरील फराळी बैठकांच्या माध्यमातून शासनापर्यंत त्यांच्या व्यथा पोचविणे, त्यांच्या काही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांतून तुम्ही एकटे नाहीत संपूर्ण समाज तुमच्यासोबत आहे. हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील अनेक देणगीदारांनी साथ दिली. त्यांचेही आभार मयूरेश पाटणकर यांनी मानले. Anulom_Faral


