• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 November 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यस्तरीय थ्री डी रांगोळी स्पर्धेत केदार टेंबकर प्रथम

by Mayuresh Patnakar
November 10, 2026
in Guhagar
29 0
0
State Level 3D Rangoli Competition
57
SHARES
163
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारत शिक्षण मंडळ; किशोर पांचाळ द्वितीय, विकास गायकवाड तृतीय विजेते

रत्नागिरी, ता. 10 : भारत शिक्षण मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित थ्री रांगोळी स्पर्धेत कुडाळच्या केदार टेंबकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी तानपुरा घेऊन आराम करणाऱ्या आजोबांची सुरेख रांगोळी साकारली होती. प्रचंड मेहनत घेऊन आणि सुमारे 24 तासांहून अधिक काळ बसून ही रांगोळी चितारली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक किशोर पांचाळ (मुंबई, गणपती) आणि तृतीय क्रमांक विकास गायकवाड (वारणा, कोल्हापूर, मासे विकणारी महिला) यांनी मिळवल्याची माहिती संस्थेच कार्यवाह धनेश रायकर यांनी दिली. State Level 3D Rangoli Competition

या चुरशीच्या स्पर्धेत सुमारे २५ रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. स्पर्धकांना रांगोळी साकारण्यासाठी एक दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात थ्री डी रांगोळी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला राज्यातील विविध भागांतून स्पर्धक सहभागी झाले हे विशेष. State Level 3D Rangoli Competition


स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक अभिषेक सुतार (भांडुप, मुंबई), विजय मेस्त्री (कुडाळ), आणि ओम मोरे (छत्रपती संभाजीनगर), निवृत्ती धुळे (अमरावती), प्रशांत आर्वी (नाशिक) यांनी मिळवला. हे प्रदर्शन आजपासून १२ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. थ्री डी रांगोळीच्या माध्यमातून कलात्मकतेचा अनोखा आविष्कार पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनात गणपती, बाळकृष्ण, मासे विकणारी महिला, खेकडा, फुटबॉलपटू, पुस्तक वाचणारी मुलगी, मराठमोळी महिला, किटलीतून कपात चहा ओतताना, लहान बालक अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. परीक्षक म्हणून प्रभावती पिलणकर, विक्रांत मेस्त्री, सागर पुसाळकर यांनी काम पाहिले. प्रथम विजेत्याला १२ हजार रुपये, द्वितीय १० हजार व तृतीय क्रमांकाला ८ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. उत्तेजनार्थ ५ बक्षिसे प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आली. State Level 3D Rangoli Competition


यासंबंधी कार्यवाह श्री धनेश रायकर यांनी सांगितले की, यंदा प्रथमच पटवर्धन हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय रंगयात्रा २०२६ – कलेचा आविष्कार, खरेदीचा बहार या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल्स हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. ज्वेलरी, कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ तसेच विविध आकर्षक उत्पादनांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. खरेदीच्या महोत्सवासोबतच थ्री डी रांगोळी प्रदर्शन आणि विशेष शोभिवंत मत्स्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.  State Level 3D Rangoli Competition

शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. खरेदी, कला, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजन यांचा संगम असलेल्या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष सौ नमिता कीर आणि कार्याध्यक्ष श्री श्रीराम भावे  यांच्याकडून करण्यात आले आहे. State Level 3D Rangoli Competition

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarState Level 3D Rangoli Competitionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet14
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.