गुहागर, ता. 04 : रत्नागिरी येथे २९ व ३० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धा २०२६–२७ मध्ये कोकण विभागाच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत कोकण, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या चार विभागांचे संघ सहभागी झाले होते. Raj Bhosale in Konkan region team in Kabaddi tournament
या स्पर्धेत कोकण विभागाच्या मुलांच्या संघात वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी कु. राज दिनेश भोसले याची अंतिम संघात निवड झाली होती. त्याने कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करत स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्तरावर कोकण विभागाच्या संघातून खेळण्याची संधी मिळाल्याने त्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. Raj Bhosale in Konkan region team in Kabaddi tournament

राज भोसले याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार, कार्यालयीन प्रभारी डॉ. संतोष चतुर्भुज व श्री. हृषिकेश गोखले, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. गणेश दिवे, क्रीडा समन्वयक श्री. औदुंबर पाटकर तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Raj Bhosale in Konkan region team in Kabaddi tournament
महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातील कौशल्यांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन आणि विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. राज भोसले याच्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून त्याच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. Raj Bhosale in Konkan region team in Kabaddi tournament
