• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एसटीच्या दरवाज्यात पदर अडकल्याने महिला जखमी

by Manoj Bavdhankar
October 31, 2026
in Guhagar
151 1
0
Accident at Ghonsare-Chiveli Top
296
SHARES
845
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

घोणसरे चिवेली फाट्यावर अपघात

गुहागर, ता. 31 : गुहागर-चिपळूण मार्गावर गुहागर- रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचा घोणसरे चिवेली फाट्यावर उतरत असताना पदर अडकल्याने उतरलेल्या महिलेच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Accident at Ghonsare-Chiveli Top

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला गुहागर तालुक्यातील रहिवासी असून, आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येथील एका रुग्णालयात येत होती. ती सकाळी आठ वाजता गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर-रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करत होती. घोणसरे येथे बसमधून उतरत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. यावेळी बसचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला मदत केली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. Accident at Ghonsare-Chiveli Top

Tags: Accident at Ghonsare-Chiveli TopGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share118SendTweet74
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.