DYSP अविनाश पाटील यांचा नागरिकांशी संवाद
गुहागर, ता. 29 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau, Ratnagiri) रत्नागिरी विभागाच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शृंगारतळी येथे चर्चासत्र व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पाटपन्हाळे, शृंगारतळी येथे सायंकाळी ४.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau) चे उपअधीक्षक अविनाश पाटील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. Public awareness on corruption prevention
लाच मागितल्यास नागरिकांनी काय करावे, तक्रार कुठे व कशी दाखल करावी आणि तक्रारदाराची ओळख गोपनीय कशी ठेवली जाते, याबाबत या चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून लाच मागण्याच्या घटनांविरोधात पुढे यावे, या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुहागर तालुक्यातील नागरिकांनी या चर्चासत्राला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau, Ratnagiri) यांच्याकडून करण्यात आले आहे. Public awareness on corruption prevention
