• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात ९१.३० टक्के बालके सामान्य पोषण श्रेणीत

by Mayuresh Patnakar
October 28, 2026
in Ratnagiri
23 0
0
44
SHARES
127
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 28 : जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संख्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अधिकृत आकडेवारीसह खुलासा सादर केला आहे. प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये तीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची दिलेली आकडेवारी चुकीची असून, जिल्ह्यातील बहुतांश बालके सर्वसाधारण (निरोगी) पोषण श्रेणीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे. Registration of malnourished children

वृत्तांमध्ये तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीत ३९० बालके आणि मध्यम तीव्र कुपोषित (MAM) श्रेणीत २,९५२ बालके नोंद असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सप्टेंबर २०२६ अखेरच्या अधिकृत सर्वेक्षणातील वास्तव आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
 * एकूण सर्वेक्षण: जिल्ह्यातील २,८१२ कार्यरत अंगणवाड्यांमधील ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण ४२,८७२ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
 * सर्वसाधारण पोषण श्रेणी: यापैकी तब्बल ३९,१४९ बालके (९१.३०%) सर्वसाधारण पोषण श्रेणीत आहेत. Registration of malnourished children
 * तीव्र कुपोषण (SAM): जिल्ह्यात तीव्र कुपोषित श्रेणीत केवळ ३३ बालके (०.०८%) नोंदविण्यात आली आहेत.
 * मध्यम तीव्र कुपोषण (MAM): मध्यम तीव्र कुपोषित श्रेणीत ५१४ बालके (१.१९९%) आढळली आहेत.

आरोग्य व पोषणविषयक उपाययोजनांवर भर

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून कुपोषण निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत कुपोषित बालकांची वेळेवर ओळख पटवून त्यांना नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार, लोहयुक्त सिरप वाटप आणि सकस आहारविषयक मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यातील कुपोषणाच्या स्थितीचा विचार करताना केवळ कुपोषित बालकांची संख्या न मांडता, एकूण सर्वेक्षित बालकांची संख्या आणि ९१ टक्क्यांहून अधिक बालके सामान्य पोषण श्रेणीत असल्याचे सकारात्मक चित्र जनतेसमोर येणे आवश्यक आहे. Registration of malnourished children

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRegistration of malnourished childrenटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.