• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली सौरऊर्जा प्रकल्पातून १,३५,५९९ युनिट्सची निर्मिती

by Mayuresh Patnakar
October 28, 2026
in Guhagar
74 1
0
Varveli Solar Power Project
146
SHARES
418
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पहिल्यात महिन्यात ५,७६,२९६ रु. उत्पन्न हरित ऊर्जेची उत्तम निर्मिती

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मौजे वरवेली येथील १ मेगावाट क्षमतेच्या प्रकल्पातून सप्टेंबर २०२६ पासून वीज विक्रीला प्रारंभ झाला आहे. पहिल्याच महिन्यात या प्रकल्पाने १,३५,५९९ युनिट्सची निर्मिती करून ५,७६,२९६ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.  तसेच रत्नागिरी तालुक्यातील मौजे गोळप येथे १ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प ऑक्टोबर २०२४ पासून कार्यान्वित आहे. या प्रकल्पाने ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२६ या २४ महिन्यांच्या काळात एकसलग भलीमोठी कामगिरी केली असून या कालावधीत गोळप प्रकल्पातून एकूण २३ लाख ९५ हजार १० किलो व्होल्ट विजेची निर्मिती झाली आहे. या दोन्ही प्रकल्पांचा मिळून सप्टेंबर २०२६ अखेर जमा झालेला हा मोठा निधी रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. Varveli Solar Power Project

सूर्याची किरणे आता केवळ प्रकाशच देत नाहीत, तर रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला आणि तिजोरीला एक नवी ऊर्जा आणि आर्थिक बळ पुरवत आहेत. मौजे गोळप आणि मौजे वरवेली येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांनी हरित ऊर्जेची उत्तम निर्मिती करत उत्पन्नाचा नवा विक्रम रचला आहे. या दोन्ही प्रकल्पांना आतापर्यंत तब्बल १ कोटी ६ लाख ८३ हजार ७७९ रुपयांची घसघशीत कमाई झाली असून, ग्रामीण भागातील हा ऊर्जा प्रकल्प पर्यावरण रक्षणासोबतच आर्थिकदृष्ट्या अतिशय यशस्वी ठरत आहे. Varveli Solar Power Project

ग्रामीण भागातून पर्यावरणपूरक पद्धतीने मिळणारे हे आर्थिक उत्पन्न जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पाडत आहे. स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या या प्रकल्पांमुळे हरित ऊर्जेचे महत्त्व पटवून देत शाश्वत विकासाचा एक नवा पायंडा रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे पाडला गेला आहे. Varveli Solar Power Project

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVarveli Solar Power Projectटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet37
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.