• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 October 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर

by Mayuresh Patnakar
October 19, 2026
in Guhagar
37 0
0
The first railway cold storage in the state
72
SHARES
205
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्यातील पहिले रेल्वे शीतगृह; दोन हजार टन साठवण क्षमता

गुहागर, ता. 19 : हापूस आंबा, मासळी, द्राक्षे आणि डाळिंबासारख्या नाशवंत उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण रेल्वेने शीतसाखळी विकसित करण्याचा पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी येथे दोन हजार टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात येणार असून, त्यासाठी कोकण रेल्वे आणि सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.  या प्रकल्पासाठी जागा कोकण रेल्वे उपलब्ध करून देणार असून, उभारणीसाठीची गुंतवणूक महामंडळ करणार आहे. महसूल वाटपाच्या तत्त्वावर उभारण्यात येणारे हे शीतगृह दीड वर्षात सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली. The first railway cold storage in the state

वाशी येथील सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्रात गुरुवारी (ता. १५) कोकण रेल्वेचा ३७ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात झा यांनी शीतसाखळी सुविधांसह महामंडळाच्या मालवाहतुकीसंदर्भातील योजनांची माहिती दिली. या वेळी संचालक (ऑपरेशन व कमर्शियल) सुनील गुप्ता, संचालक (वे आणि वर्क्स) राजीव कुमार मिश्रा, मुख्य दक्षता अधिकारी अविनाश तरहवाडकर आणि कोकण रेल्वे महिला सांस्कृतिक व सामाजिक सेवा संघटनेच्या अध्यक्षा मनीषा झा उपस्थित होत्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. The first railway cold storage in the state

मासळीपासून फळांपर्यंत साठवणुकीची सुविधा

प्रस्तावित शीतगृहात उणे २१ आणि ४ अंश सेल्सिअस तापमानाचे स्वतंत्र कक्ष असतील. त्यामध्ये मासळी, गोठवलेले मांस, आंब्याचा गर, दूध, बटर आणि फळे साठवता येतील. कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागांतून येणाऱ्या डाळिंब, कांदे आणि द्राक्षांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. कोकण रेल्वेच्या मालवाहतूक केंद्रावर अशा प्रकारचे शीतगृह उभारण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. The first railway cold storage in the state

जागा रेल्वेची, गुंतवणूक महामंडळाची

रत्नागिरी येथील रेल्वे मालवाहतूक केंद्रावर हे शीतगृह उभारले जाणार आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणार असून, सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन उभारणीचा खर्च करणार आहे. महसूल वाटपाच्या तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे नाशवंत मालाची साठवणूक आणि रेल्वेमार्गे वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. The first railway cold storage in the state

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe first railway cold storage in the stateटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.