ओशन स्पार्कल’ जहाजावरील दुर्दैवी घटना
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अंजनवेल येथील ‘कोकण एलएनजी’ (RGPPL) कंपनीच्या जेट्टीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या ब्रेकवॉटर परिसरात समुद्रात पडून एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१० ऑक्टोबर २०२६) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली. Contract worker dies at Anjanvel
राहुलकुमार लालसाहेब यादव (वय २२, रा. शरीफपूर, शिखीखुर्द, ता. हंडिया, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी शाहरुख हिशामुद्दीन हुसेन यांनी गुहागर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. Contract worker dies at Anjanvel
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शाहरुख हुसेन हे ‘ओशन स्पार्कल लिमिटेड’ (Ocean Sparkle Limited) कंपनीच्या ‘ओशन स्वान १’ (Ocean Swan 1) या जहाजावर टग मास्टर-२ म्हणून कार्यरत आहेत. मृत राहुलकुमार यादव हा २३ सप्टेंबर २०२६ पासून याच जहाजावर ट्रेनी डेक रॅटिंग (क्रू) म्हणून कामाला होता. शनिवारी सकाळी एलएनजी गॅस घेऊन आलेले ‘गॅस पोलारिस’ हे जहाज जेट्टीकडे सुरक्षित आणण्यासाठी ‘ओशन स्वान १’ वरील कर्मचाऱ्यांनी मदत केली. सकाळी ११:३० च्या सुमारास गॅसचे जहाज सुरक्षितपणे जेट्टीला लावल्यानंतर, ओशन स्वान १ हे जहाज जेट्टीजवळील ब्रेकवॉटर परिसरात अँकर (नांगर) टाकून थांबले होते. Contract worker dies at Anjanvel
दुपारी १२:४० च्या सुमारास तक्रारदार जेवण करून जहाजावरील केबिनमध्ये विश्रांतीसाठी गेले. त्यानंतर पाच मिनिटांत जहाजावरील कर्मचारी सनी मसिह याने आरडाओरडा करत राहुलकुमार यादव समुद्रात पडल्याचे आणि त्याचा मोबाईल जहाजाच्या डेकवर असल्याचे सांगितले. माहिती मिळताच जहाजावरील कर्मचारी रोहित सिंग, ओमप्रकाश दुबे, ए. ए. सिद्दीकी आणि लकी गुप्ता यांनी डेकवर धाव घेतली. पाहणी केली असता राहुलकुमार यादव हा समुद्राच्या पाण्यात उत्ताण अवस्थेत तरंगताना दिसला. जहाजावरील फर्स्ट मास्टर जयशंकर शर्मा यांनी तातडीने ‘जेट्टी कंट्रोल’ आणि ‘सी केअर ६’ सिक्युरिटी स्पीड बोटला व्हीएचएफ (VHF) रेडिओद्वारे संपर्क साधून पाचारण केले. स्पीड बोटीच्या साहाय्याने राहुलकुमारला पाण्यातून बाहेर काढून मटेरिअल जेट्टीवर आणण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्याला आरजीपीपीएल (RGPPL) मेडिकल सेंटर, अंजनवेल येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक यांनी तपासणी करून दुपारी १:५७ वाजता त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (अ. मृ. क्र. ४२/२०२६, BNSS १९४) म्हणून करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. Contract worker dies at Anjanvel