• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 October 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करा

by Mayuresh Patnakar
October 7, 2026
in Guhagar
23 0
1
Guhagar Central Level Education Council
46
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत उपसभापती निलेश सुर्वे यांचे प्रतिपादन

गुहागर, ता. 07 : इयत्ता चौथी शिष्यवृत्ती, इयत्ता सातवी शिष्यवृत्ती, नासा इसरो परीक्षा, मिशन लोकशाही परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करावा व त्याद्वारे शाळांचा सर्वांगीण वाढवता विकास साधावा, असे प्रतिपादन गुहागर श्री अन्नपूर्णा वैद्य विद्यालय गुहागर येथे संपन्न झालेल्या गुहागर केंद्राच्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये गुहागर पंचायत समितीचे उपसभापती श्री निलेशजी सुर्वे साहेब यांनी केले. Guhagar Central Level Education Council

ते पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षण हाच खरा उच्च शिक्षणाचा पाया आहे, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी  सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजनासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. शिक्षण परिषदेचे उद्घाटन दीपप्रज्वलन श्री निलेश सुर्वे साहेब यांच्या शुभहस्ते झाले. शिक्षण विस्तार अधिकारी सारिका शिंदे मॅडम सरस्वती देवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुहागर नंबर एक शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री ईश्वर वासावे हे होते. त्यावेळी केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, अन्नपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री समीर गुरव, गुहागर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता कांबळे मॅडम, केंद्र मुख्याध्यापिका सौ मनीषा शिंदे मॅडम, विषय शिक्षक श्री शिवानंद साखरे, रीडटू रूम चे गुहागर तालुका समन्वयक श्री रामटेके सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक व शिक्षक उपस्थित होते. Guhagar Central Level Education Council

यावेळी ऑनलाईन कामकाज व पीजीआय मानांकन बाबत मार्गदर्शन असगोली नंबर एक शाळेचे तंत्रशिक्षक श्री प्रदीप पवार सर यांनी केले. श्रीमती बागल मॅडम यांनी गणिताचे सक्षमीकरण या विषयावर सर्व शिक्षकांना विविध उदाहरणांद्वारे सखोल मार्गदर्शन केले. गुहागर हायस्कूलचे श्री वैभव ढोणे सर यांनी इंग्रजी विषयातील विद्यार्थी अंतर क्रिया बाबत अत्यंत सोप्या भाषेमध्ये, विविध उदाहरणाद्वारे सखोल मार्गदर्शन केले. आरे भंडारवाडा शाळेचे श्री देशमुख सर यांनी निपुण महाराष्ट्र अंतर्गत शासनाच्या उपक्रमाची कशी अंमलबजावणी करता येईल याबाबत अतिशय समर्पकपणे मार्गदर्शन केले. Guhagar Central Level Education Council

गुहागर हायस्कूलचे श्री मधुकर गंगावणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व गुहागर नंबर 1 शाळेचे अष्टपैलू शिक्षक श्री अमोल धुमाळ यांना पंचायत समिती गुहागर शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. नवनियुक्त शिक्षण सेवकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. असगोली नंबर दोन शाळेच्या शिक्षिका प्रियंका शिंदे मॅडम यांची पवित्र पोर्टल द्वारे सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. Guhagar Central Level Education Council

शिक्षण विस्तार अधिकारी सारिका शिंदे मॅडम यांनी सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले, गुणवत्ता क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुयश प्राप्त करून उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक व मार्गदर्शक यांचा सन्मान करण्यात आला.  केंद्रप्रमुख मनोज पाटील यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला व शैक्षणिक मार्गदर्शन केले. Guhagar Central Level Education Council

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ईश्वर वसावे सर यांनी शिक्षण परिषद यशस्वी केल्याबद्दल अन्नपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गुरव सर्व शिष्यवृत्ती यांचे आभार व्यक्त केले. तसेच तज्ञ मार्गदर्शक यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गुहागर केंद्रांनी गुणोत्तर क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आभार प्रदर्शन  श्री राजू जानू सुर्वे यांनी केले. Guhagar Central Level Education Council

Tags: GuhagarGuhagar Central Level Education CouncilGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.