गुहागर हायस्कुलच्या मधुकर गंगावणे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल
गुहागर, ता. 07 : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कार्य करणारे श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक श्री. मधुकर आनंदी-शंकर गंगावणे यांना रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदर्श शिक्षक विद्यारत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. ‘Adarsh Vidyaratna Puraskar’ for Gangavane Sir
श्री. गंगावणे हे १९९४ पासून शाळेच्या नियमित कामकाजासोबत गणित विषयाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. तसेच शाळेच्या वेळेव्यतिरिक्त ते विद्यार्थ्यांना NEET व JEE परीक्षेनंतरची प्रवेशप्रक्रिया, प्रवेशपद्धती तसेच आवश्यक शासकीय दाखल्यांची माहिती विनामूल्य देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश घेण्यास मदत झाली आहे. या कार्याची दखल घेत मा. प्राचार्य श्री. प्रशांत गणेश कुलकर्णी (पुणे) यांच्या हस्ते श्री. गंगावणे यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘Adarsh Vidyaratna Puraskar’ for Gangavane Sir
यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय काशीद, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. भरत पाटील, पीआरओ रेश्मा तांबे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. सचिन बेर्डे, पर्यटन व पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. बाळासाहेब नकाते, श्री. विद्यमान गुरव, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. संजय भागवत, देशमाने सर, जिल्हा संघटक श्री. विपुल देसाई यांच्यासह राष्ट्रीय व राज्य स्तरावरील संघटक उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर तसेच खेडेकर मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ‘Adarsh Vidyaratna Puraskar’ for Gangavane Sir
दरम्यान, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पर्यटन व्यावसायिक तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित व्यक्तींनी संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे आणि शिक्षण, पर्यटन व पर्यावरण क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. ‘Adarsh Vidyaratna Puraskar’ for Gangavane Sir
ह्या पुरस्काराबद्दल श्री.गंगावणे सर यांनी सर्व श्रेय आजी माजी संचालक, सर्व सहकारी, शिक्षणप्रेमी पालकवर्ग आणि गुहागरवासीय नागरीक, आजी माजी विद्यार्थी आणि कुठूंबिय यांना दिले. ‘Adarsh Vidyaratna Puraskar’ for Gangavane Sir
