दुष्काळजन्य स्थितीत मासेमारीबाबत शासन स्तरावर निर्णय होणार का?
गुहागर, ता. 05 : यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ५ हजार ९०७ मे. टन तर सिंधुदुर्गचे मत्स्योत्पादन ६ हजार ४१३ मे. टनने कमी झाले आहे. गतवर्षी मे महिन्याच्या अखेरीस वादळी हवामानामुळे १५ दिवस अगोदरच मासेमारी बंद करावी लागल लागल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यातील २६५ तालुक्यामंध्ये दुष्काळ जाहीर झाला असून पाण्याअभावी जलाशयांमधील मासेमारीदेखील अडचणीत सापडली आहे. अशा दुष्काळजन्य स्थितीत सागरी मासेमारीबाबत शासन स्तरावर काही निर्णय होणार का? याकडे सागरी मच्छीमारांचे लक्ष लागून आहे. Decline in fish production this year
गतवर्षीच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये राज्याच्या सागरी मत्स्योत्पादनात ४ हजार ५४६ मेट्रीक टन इतकी घट पहावयास मिळाली आहे. मात्र ही घट मत्स्यदुष्काळ जाहीर होण्यासाठी पुरेशी नाही. कारण शासकीय निकषानुसार मागील तीन वर्षातील सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी मत्स्योत्पादन झाल्यास मत्स्य दुष्काळ जाहीर होऊ शकतो. पण २०२५- २६ च्या आकडेवारीनुसार तशी परिस्थिती नाही. मत्स्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये ४ लाख ४६ हजार २५६ मे. टन, २०२३-२४ मध्ये ४ लाख ३४ हजार ५७४ मे. टन तर २०२४-२५ मध्ये राज्याचे मत्स्योत्पादन ४ लाख ६३ हजार ७५८ मे. टन इतके मत्स्योत्पादन झाले होते. Decline in fish production this year
गतवर्षीच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये त्यात किंचित घट होऊन मत्स्योत्पादन ४ लाख ५९ हजार २१२ मे. टनावर स्थिरावले आहे. रायगडच्या मत्स्योत्पादनात विक्रमी वाढ यंदाच्या मत्स्योत्पादनाचे वैशिष्ट्य म्हणजे रायगड जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात तब्बल चौपट वाढ तर मुंबई उपनगरच्या मत्स्योत्पादनात सुमारे ७५ टक्के इतकी घट झाली आहे. २०२३-२४ मध्ये रायगड जिल्हयाचे मत्स्योत्पादन ३३ हजार ३५९ मे. टन तर २०२४-२५ मध्ये ते ३५ हजार २७ मे. टन इतके होते. मात्र २०२५-२६ च्या हंगामात ते १ लाख ४६ हजार ७८३ मे. टन इतके वाढले आहे. २०२३-३४ मध्ये मुंबई उपनगरचे मत्स्योत्पादन ७८ हजार २९६ मे. टन तर २०२४-२५ मध्ये ७५ हजार २५४ मे. टन इतके होते. २०२५-२६ मध्ये ते १९ हजार ६६९ मे. टन एवढे मोठ्या प्रमाणात घटले आहे. एल निनो ‘मुळे यंदाच्या हंगामाकडे लक्ष एल निनो मुळे भारतीय मान्सूनवर गंभीर स्वरुपाचा आघात होऊन यंदा कोकणपट्टीसह महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला आहे. Decline in fish production this year
एल निनो हा प्रशांत महासागरात घडणारा एक नैसर्गिक बदल आहे. दक्षिण अमेरिकेच्या पेरू आणि इक्वाडोर किनाऱ्याजवळील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम झाल्यावर एल निनोची परिस्थिती निर्माण होते. या बदलाचा परिणाम केवळ त्या भागापुरता मर्यादित राहत नाही तर जगभरातील हवामानावर होतो. त्यामुळे यंदाच्या मत्स्य हंगामावर ‘एल निनो चा काय परिणाम होतोय याकडे मच्छीमारांसह शासनाचे लक्ष लागून आहे. Decline in fish production this year
मागील चार वर्षातील राज्य मत्स्योत्पादन २०२२-२३ – ४,४६,२५६ मे. टन २०२३-२४ ४,३४,५७४ मे. टन २०२४-२५ ४,६३,७५८ मे. टन २०२५-२६ ४,५९,२१२ मे. टन रत्नागिरी जिल्ह्याचे मागील सहा वर्षांचे मत्स्योत्पादन २०२२-२३ ६२,७१७मे. टन २०२३-२४ ६७,९०७मे. टन २०२४-२५ ७१,३०३ मे. टन २०२५-२६ ६५,३९६ मे. टन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मागील चार वर्षांचे मत्स्योत्पादन २०२२-२३ २२,४५७मे. टन २०२३-२४ २२,३२९ मे. टन २०२४-२५ २३,४४५ मे. टन २०२५-२६ १७,०३२ मे. टन २०२५-२६ मधील जिल्हानिहाय मत्स्योत्पादन पालघर २८,१८३ मे. टन ठाणे ५४,६६२ मे. टन मुंबई उपनगर १९,६६९ मे. टन बृहमुंबई १,२७,४८७ मे. टन रायगड १,४६,७८३ मे. टन रत्नागिरी ६५,३९६ मे. टन सिंधुदुर्ग १७,०३२ मे. टन Decline in fish production this year
