धनादेश अनादर प्रकरणे तडजोडीने मिटवण्याची सुवर्णसंधी
रत्नागिरी, ता. 05 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने येत्या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष लोकअदालत रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केली जाईल. Special Lok Adalat
या विशेष लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने न्यायालयातील प्रलंबित बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित धनादेश अनादर (Cheque Bounce) प्रकरणे तडजोडीने व परस्पर संमतीने निकाली काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. श्री. विनोद यशवंतराव जाधव यांनी केले आहे. Special Lok Adalat
पक्षकारांनी आपली प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवण्यासाठी आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव श्री. राजेंद्र रामचंद्र पाटील यांनी केले आहे. Special Lok Adalat
