• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य

by Mayuresh Patnakar
October 2, 2026
in Maharashtra
49 1
0
दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य
96
SHARES
275
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

मुंबई, ता. 02 : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या महसूल विभागात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची भर पडली आहे. दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. जर दस्त करणाऱ्या पक्षकारांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांच्या दस्ताची नोंदणी होणार नाही. विविध दस्तांची नोंदणी होत असताना खोटे साक्षीदार आणि खोटे पक्षकार उभे करुन केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. Aadhaar card is mandatory for document registration

महाराष्ट्र शासनाच्यावतीनं या निर्णयासंदर्भातील राजपत्र प्रकाशित करण्यात आलं आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्त नोंदणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आधार नाही तर कोणतीच दस्त नोंदणी होणार नाही. दस्त नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहेत. दस्तनोंदणी, जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणांमध्ये खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक आता हद्दपार होणार आहे. Aadhaar card is mandatory for document registration

राज्य सरकारनं दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. यामुळं खरेदी, विक्री, बक्षीस, गहाण, वाटणीसह 63 प्रकारच्या नोंदीसाठी आधार ओळखपत्र सक्तीचे असेल. दस्तनोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्याचा निर्णय 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाचं राजपत्र जारी झालं आहे. आता दस्त नोंदणी करताना आता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आल्यानं खोटे साक्षीदार आणि खोटे पक्षकार उभे करता येणार नाहीत. यामुळं दस्त नोंदणीतील फसवणुकीचे प्रकार आता हद्दपार होतील. यामुळं दस्तनोंदणी प्रक्रिया आणखी पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.Aadhaar card is mandatory for document registration

Tags: Aadhaar card is mandatory for document registrationDocument RegistrationGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यादस्त नोंदणीमराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.