निवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन समस्यांचे होणार निवारण
रत्नागिरी, ता. 01 : अधीक्षक डाकघर, चिपळूण विभागीय कार्यालयाच्या वतीने शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता विभागीय डाक कार्यालय, चिपळूण येथे ‘विभागीय पेन्शन अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. Postal Pension Court at Chiplun
या पेन्शन अदालतमध्ये सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारींवर विचार करून त्यांचे निवारण केले जाईल. ज्या तक्रारींचे निवारण मागील ३ महिन्यांत झालेले नाही, केवळ अशाच प्रकरणांची दखल या अदालतीत घेतली जाणार आहे. तथापि, नीतिगत प्रकरणे (उदा. वारसा हक्क/उत्तराधिकार) आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित अर्जांचा विचार केला जाणार नाही. Postal Pension Court at Chiplun
संबंधितांनी आपला तक्रार अर्ज ‘मा. अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, चिपळूण – ४१५६०५’ या पत्त्यावर दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज सादर करावा. अर्जामध्ये तक्रारीचा तपशील, तारीख आणि यापूर्वी ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली होती त्यांचे नाव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांवर पेन्शन अदालतीत कोणताही विचार केला जाणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे डाकघर अधीक्षकांनी कळविले आहे. Postal Pension Court at Chiplun
