• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी बाजारपेठेत अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वाद

by Mayuresh Patnakar
October 2, 2026
in Guhagar
153 2
0
301
SHARES
861
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थिनीच्या कानाखाली मारल्याने खळबळ

गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जवळच असलेल्या महामार्गालगतच्या महाविद्यालयातील अकरावीतील विद्यार्थिनी आणि बारावीतील विद्यार्थी यांच्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. Uproar over female student being slapped

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा असून, विद्यार्थिनीने फोन न उचलल्याच्या रागातून विद्यार्थ्याने तिच्या कानाखाली मारल्याचे सांगण्यात येते. बाजारपेठेत हा प्रकार घडत असताना नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलीस चौकीत नेले. विद्यार्थिनीने सुरुवातीला संबंधित मुलाविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेतले. Uproar over female student being slapped

दरम्यान, विद्यार्थिनीच्या पालकांनी संबंधित विद्यार्थ्याविरोधात तक्रार दिल्याची माहिती आहे. यापूर्वीही मुलीच्या वडिलांनी संबंधित विद्यार्थ्याला अशा प्रकारापासून दूर राहण्याची ताकीद दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून होणारे वर्तन आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. प्रकरणाबाबत पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. Uproar over female student being slapped

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUproar over female student being slappedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.