• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मिशन अभयअंतर्गत विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन

by Manoj Bavdhankar
September 30, 2026
in Guhagar
20 0
0
Safety guidance for students in Guhagar
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. ३० : रत्नागिरी पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन प्रबोधन’ व ‘मिशन अभय’ अभियानांतर्गत विद्यार्थी सुरक्षा व बालसंरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे मंगळवारी (दि. २९) संपन्न झाला. Safety guidance for students in Guhagar

गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल सीमा मोरे व सरिका चाळके यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, बालसंरक्षण, POCSO कायदा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक तसेच अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क साधताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. चांगला व वाईट स्पर्श, संशयास्पद परिस्थितीत पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घेणे, दैनंदिन जीवनात सजग राहणे आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. किशोरवयीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. Safety guidance for students in Guhagar

कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, उपमुख्याध्यापिका मनिषा सावंत, पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर, पोलीस हवालदार गौरी शेटे व पोलीस कॉन्स्टेबल रुचिता ताम्हणकर उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ज्योती देवकर यांनी केले, तर उपमुख्याध्यापिका मनिषा सावंत यांनी आभार मानले. Safety guidance for students in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSafety guidance for students in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.