• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अपघातविरहित एसटी सेवा चालक महेश शिर्के सेवानिवृत्त

by Mayuresh Patnakar
September 29, 2026
in Guhagar
91 1
0
ST driver Mahesh Shirke retires
179
SHARES
510
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : एसटी महामंडळात तब्बल २२ वर्षे प्रदीर्घ व अपघातविरहित सेवा बजावणारे चालक महेश शिर्के नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या सेवाकाळात सुरक्षित आणि जबाबदारीने एसटी बस चालवत त्यांनी प्रवाशांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. महेश शिर्के यांची सेवनिवृत्ती ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. ST driver Mahesh Shirke retires

कोरोना महामारीच्या काळातही शिर्के यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेची धुरा सांभाळली. विद्यार्थ्यांना विविध सहलींच्या माध्यमातून पर्यटनस्थळे दाखवून त्यांना त्या ठिकाणची माहिती देण्याचे कामही त्यांनी केले. कलावती आई, बेळगाव यांच्या माध्यमातून एसटी बस घेऊन त्यांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये प्रवास केला. या प्रवासातून विविध भागांतील संस्कृती, इतिहास व पर्यटनस्थळांची माहिती विद्यार्थ्यांना व प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे शिक्षण पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये झाले. त्यावेळीही कोणताही कार्यक्रम असो या उपक्रम असो यामध्ये ते हिरारीने भाग घेत होते. शालेय जीवनात त्यांनी अनेक वेशभूषा केल्या. त्याचप्रमाणे नोकरीच्या कालावधीतही एसटीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून अनेकांची मने जिंकली. एसटी सेवा ही केवळ नोकरी न मानता सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या महेश शिर्के यांच्या २२ वर्षांच्या अपघातविरहित सेवेला सहकारी, प्रवासी आणि नागरिकांनी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. ST driver Mahesh Shirke retires

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarST driver Mahesh Shirke retiresटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.