युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन
रत्नागिरी, ता. 28 : देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, महाराष्ट्र शासनाच्या ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा’मार्फत ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. Employment Mahakumbh in the district
या उपक्रमांतर्गत मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात एकाच दिवशी ५०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात तालुका व जिल्हास्तरावर एकूण ११ ठिकाणी भव्य रोजगार मेळावे होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी दिली. Employment Mahakumbh in the district
जिल्ह्यातील मेळाव्यांची ठिकाणे
खेड: शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित बहुउद्देशीय हॉल, तळ्याचे वाकण, खेड शहर रत्नागिरी: गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, ॲड. एन. व्ही. जोशी मार्ग, जिल्हा न्यायालयाजवळ
शिरगाव (रत्नागिरी): मत्स्य महाविद्यालय, शिरगाव
देवरुख (संगमेश्वर): DeCAD – देवरुख कॉलेज ऑफ आर्ट ॲण्ड डिझाईन, भागवत संकुल
लांजा: कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ताज सिटी सेंटर
राजापूर: राजापूर हायस्कूल, राजापूर
गुहागर: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), RGTTL कंपनीजवळ, अंजनवेल
चिपळूण: न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती)
मोरवंड-बोरज (खेड): ज्ञानदीप महाविद्यालय (विज्ञान व वाणिज्य)
दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
मंडणगड: लोकनेते गोपीनाथजी मुंडे आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज Employment Mahakumbh in the district
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा उपलब्ध क्यूआर (QR) कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी. नोंदणीकृत उमेदवारांनी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वतःचा अद्ययावत बायोडाटा (Biodata) आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह संबंधित केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी केले आहे. Employment Mahakumbh in the district