• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर एमआयडीसीचे ठिकाण गुलदस्त्यात

by Mayuresh Patnakar
September 23, 2026
in Guhagar
77 1
0
Guhagar MIDC location in bouquet
151
SHARES
431
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गणपती दर्शनाच्या निमित्ताने सभापती, उपसभापतींची भेट घेतल्याची चर्चा

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील गोळवली येथील एका कार्यक्रमात गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पालकमंत्र्यांकडे आम्ही एमआयडीसीची मागणी केलेली असून या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जाहीर केल्याने गणेशोत्सवातील ही सुवार्ता जमीनमालक आणि दलालांनी सुखावून गेलेली दिसून येत आहे. Guhagar MIDC location in bouquet

या कार्यक्रमात सभापतींनी एमआयडीसीचे संकेत दिलेले असले तरी त्यांनी नेमकी कोणत्या ठिकाणी होणार हे गुलदस्त्यात ठेवल्याने काही ॲक्टीव्ह जमीनमालक, दलालांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने सभापती व उपसभापती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत निश्चित एमआयडीसीचे नेमके लोकेशन कुठले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. Guhagar MIDC location in bouquet

गुहागर तालुक्यात एमआयडीसीचा विषय सध्या गाजत आहे. वास्तविक एमआयडीसी ही मार्गताम्हाने, गिमवी भागात प्रस्तावीत होती. मात्र, येथील शेतकऱ्यांचा विरोध व तसा पालकमंत्र्यांनी हवाला देत ती रद्दची घोषणा केली होती. त्यानंतर या विषयाला पूर्णविराम मिळाला होता. ऐन गणेशउत्सवात गोळवली येथील कार्यक्रमात गुहागर सभापती पोळेकर यांनी एमआयडीसी संदर्भात सुवार्ता दिली. येणाऱ्या पिढीसाठी कशा पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील यासाठी उद्योग मंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे एमआयडीसी संदर्भात आम्ही मागणी केली आहे. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याचे पोळेकर यांनी सांगून यासाठी तीन ठिकाणच्या जागा आयडेंटिफाय झालेला आहेत. मात्र त्या जागेची नावे मी सांगत नाही. कारण जागांची नावे सांगितले की, त्या ठिकाणी दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. एखादी एमआयडीसी आणायची म्हटले तर त्या ठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात येतात आणि संबंधित शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे त्या जागांची ही आयडेंटिफाय झालेय, भविष्यात तरुणांना मुंबईच्या ठिकाणी नोकरीला जाव लागणार नाही. अशा पद्धतीची रणनीती आम्ही आखल्याचे खात्रीलायक आश्वासन दिल्याने अनेक ॲक्टीव्ह जमीनमालक, दलालांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने सभापती व उपसभापती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत वा फोन करून निश्चित एमआयडीसीचे नेमके लोकेशन कुठले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. Guhagar MIDC location in bouquet

Tags: GuhagarGuhagar MIDC location in bouquetGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.