• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शासकीय तंत्रनिकेतन कॅन्टीन निविदेस मुदतवाढ

by Mayuresh Patnakar
September 21, 2026
in Ratnagiri
60 1
0
119
SHARES
339
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज उपलब्ध

रत्नागिरी, ता. 21 : शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथील विद्यार्थी ग्राहक भंडार संचालित उपहार गृह (कॅन्टीन) चालविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, आता ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. Government Polytechnic Canteen Tender

कॅन्टीन चालविण्याच्या निविदेची विक्री करण्याची मूळ अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२६ ही होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे अनेक इच्छुकांना वेळेत अर्ज घेणे आणि निविदा सादर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे उमेदवारांना संधी मिळावी म्हणून निविदा विक्रीची तारीख आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. Government Polytechnic Canteen Tender

* निविदा विक्रीची मुदत: ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत
 * निविदा जमा करण्याची अंतिम तारीख: ३ ऑक्टोबर २०२६
 * निविदा उघडण्याची तारीख: ६ ऑक्टोबर २०२६

विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व निविदा ६ ऑक्टोबर रोजी उपस्थित निविदाकार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींसमक्ष उघडल्या जातील, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रभारी प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. Government Polytechnic Canteen Tender

Tags: Government Polytechnic Canteen TenderGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.