• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्करशेठ जाधव यांनी केली शेवगा शेतीची पाहणी

by Mayuresh Patnakar
September 9, 2026
in Guhagar
40 0
0
MLA Bhaskar Jadhav inspected the drumstick plantation
78
SHARES
224
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : पेठमाप, चिपळूण येथे शेतकरी इम्तियाज मुकादम यांनी 30 गुंठे क्षेत्रात  लावलेल्या 700 शेवगा (moringa, शेहजन, शेगुळ) झाडांची लागवडीची पाहणी आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली. कोकणात भरपूर पाऊस पडत असताना शेवगा शेती हा नवीन प्रयोग केलेला आहे, तो प्रयोग यशस्वी करा आणि त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्या संदर्भातही मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. MLA Bhaskar Jadhav inspected the drumstick plantation

भास्करशेठ हे स्वतः शेतकरी, शेतीतले जाणकार असल्यामुळे शेवग्यासाठी लागणाऱ्या खतव्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले, येणाऱ्या अडचणींची, वानर, माकड यापासून होणाऱ्या उपद्रवाची माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वानर, माकड पकडण्यासाठी रुपये सहाशे मानधन जनतेसाठी ठेवले आहे, त्याची सविस्तर माहिती दिली. आमदार भास्करशेठ जाधव यांच्यासोबत नगरसेवक फैसल कासकर, नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर जफर कटमाले उपस्थित होते. MLA Bhaskar Jadhav inspected the drumstick plantation

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMLA Bhaskar Jadhav inspected the drumstick plantationNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.