• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे स्व. ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार प्रदान

by Mayuresh Patnakar
September 7, 2026
in Guhagar
20 0
0
Heavenly Brahmraj Desai Memorial Award
40
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी प्रतिवर्षी विविध प्रकारची साहित्य निर्मिती करणाऱ्या गोवा आणि महाराष्ट्रातील साहित्यिक यांना स्वर्गीय ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार प्रदान करत असते. सन 2026 चे पुरस्कार वितरण सोहळा गोवा येथील सांखळी रविंद्र भवनात संपन्न झाला. Heavenly Brahmraj Desai Memorial Award

महाराष्ट्र मधून कवी राष्ट्रपाल सावंत यांच्या गतस्मृतीची गजबज, गणेश भाकरे याचं थेंबा थेंबाची कहाणी तर गोव्यातील अपूर्वा ग्रामोपाध्ये याचं आभास, बबिता नार्वेकर याचं शब्द प्रज्ञा,रेशम झारापकर यांचं रेशम गाठ अशा पाच साहित्यिक यांचा सन्मान करण्यात आला. साहित्यिक  राष्ट्रपाल सावंत यांच्या मनोगताला गोवेकर मंडळीनी दाद दिली,  चंद्रकांत गावस यांनी गतस्मृतीची गजबज, आभास या पुस्तकाबद्दल माहिती दिली, तर रमेश वंसकर यांनी अन्य पुस्तकं बद्दल मनोगत व्यक्त केले. Heavenly Brahmraj Desai Memorial Award

या कार्यक्रमाला विविध स्तरातील मान्यवर साहित्यिक होते. पांडुरंग कुर्टिकर अध्यक्ष गोवा स्टेट को ऑप बँक, यांच्या अध्यक्षतेत कालिदास गावस, साहित्यिक गजानन देसाई, रमेश वंसकर अध्यक्ष गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी, साहित्यिक चंद्रकांत गाव, विठ्ठल गावस उपस्थितीत होते. दीप प्रज्वलन, स्वागत, पुस्तकं परीक्षण, लेखक परिचय, पुरस्कार वितरण, पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, रक्कम पुष्प होते. Heavenly Brahmraj Desai Memorial Award

Tags: GuhagarGuhagar NewsHeavenly Brahmraj Desai Memorial AwardLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.