• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 September 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई होणार का?

by Mayuresh Patnakar
September 3, 2026
in Guhagar
230 3
0
Police Inspector Ashwanath Khedkar of Guhagar Police Station
453
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नव्या पोलिस निरीक्षकांसमोर मोठे आव्हान; कारवाईकडे तालुक्याचे लक्ष

गुहागर, ता. 03 : गुहागर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अश्वनाथ खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते रत्नागिरी जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. गुन्हे तपास, कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसिंगचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या खेडकर यांच्या नियुक्तीमुळे गुहागर पोलिसांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. Police Inspector Ashwanath Khedkar of Guhagar Police Station

अश्वनाथ खेडकर हे १९९६ मध्ये सरळ सेवेद्वारे पोलीस दलात दाखल झाले. आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेत त्यांनी मुंबई शहरात तब्बल २२ वर्षे सेवा बजावली असून मुंबई क्राईम ब्रँचमध्येही काम करण्याचा महत्त्वपूर्ण अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील गुन्हेगारीचा सामना करताना मिळालेला अनुभव त्यांच्या पुढील सेवेत निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. मुंबईनंतर त्यांनी रायगड जिल्ह्यात सेवा बजावली. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि नाटे येथेही त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. अलीकडे ते जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. विविध ठिकाणी काम करताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. Police Inspector Ashwanath Khedkar of Guhagar Police Station

दरम्यान, गुहागर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची विनंती बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अश्वनाथ खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात पर्यटनाचा वाढता विस्तार, वाहतूक व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था तसेच विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अशा परिस्थितीत मुंबई क्राईम ब्रँचपासून जिल्हा विशेष शाखेपर्यंत विविध पातळ्यांवर काम केलेल्या खेडकर यांचा अनुभव गुहागर पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यात चालू असणारे आकड्याचे, मटक्याचे, जुगाराचे व दारूचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी गुहागर पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण यांना दिले आहे. त्यामुळे नवे पोलिस निरीक्षक कशापध्दतीने कारवाई करतात. याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे. Police Inspector Ashwanath Khedkar of Guhagar Police Station

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPolice Inspector Ashwanath Khedkar of Guhagar Police Stationटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share181SendTweet113
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.