ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामाचा नमुना
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी-वेळंब मार्गावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. मात्र, पावसाच्या सरींनी या भरलेल्या खड्ड्यांतील खडी, वाळूचा माल वाहून जात आहे. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठेकेदारांची कामे अशीच चालतात का असा सवाल वाहनचालक, प्रवाशांनी उपस्थित केला आहे. Contractor’s substandard construction
शृंगारतळी- वेळंब मार्गावर सध्या खड्डे बुजविले जात आहेत. यासाठी खडी, वाळू, सिमेंट यांचे मिश्रण करुन ते खड्ड्यांमध्ये टाकले जात आहे. मात्र, पावसाच्या पाण्याने त्यातील माल वाहून जात असल्याने पुन्हा खड्डे दिसून येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची अशी रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार अशी निकृष्ट कामे करुन शासनाचा वा जनतेचा पैसा खड्ड्यात टाकत असल्याचा आरोप होत आहे. Contractor’s substandard construction
शृंगारतळी – वेळंब- आबलोली हा प्रमुख मार्ग आहे. रत्नागिरीकडे जाणारा हा मार्ग पर्यटनदृष्ट्या महत्वाचा आहे. त्यामुळे सातत्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. अशा रस्त्यावर या पध्दतीने खड्डे भरले जात असतील तर ग्रामीण भागातील रस्त्यांची काय स्थिती असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. Contractor’s substandard construction
