• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन

by Mayuresh Patnakar
August 31, 2026
in Ratnagiri
18 0
0
Sports Day Celebrated at Agriculture College
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

“‘खेळ जगा व खेळ जगवा’चा विद्यार्थ्यांनी दिला नारा”

गुहागर, ता. 31 : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली तालुका चिपळूण येथे भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘खेळ जगा व खेळ जगवा’ असा प्रेरणादायी नारा दिला. Sports Day Celebrated at Agriculture College

या कार्यक्रमास सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे महत्त्व, नियमित व्यायामाची गरज तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि संघर्ष करण्याची वृत्ती विकसित होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. Sports Day Celebrated at Agriculture College

Sports Day Celebrated at Agriculture College

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शेखरजी निकम यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही समान महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक असून, नियमित खेळामुळे शरीरासोबत मनही प्रसन्न आणि सकारात्मक राहते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्रीडागुण ओळखून त्यांना योग्य व्यासपीठावर विकसित करावे, असेही त्यांनी सांगितले. Sports Day Celebrated at Agriculture College

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा उपक्रमांना महाविद्यालयात विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. खेळामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सकारात्मक दिशा मिळते. ‘खेळ जगा व खेळ जगवा’ हा संदेश केवळ क्रीडा दिवसापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावा, असे आवाहन त्यांनी केले. Sports Day Celebrated at Agriculture College

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले. विविध क्रीडा उपक्रमांचे नियोजन व आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. क्रीडा निर्देशक सुहास आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाने कार्यक्रमाचे  नियोजन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, संघभावना आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला. Sports Day Celebrated at Agriculture College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSports Day Celebrated at Agriculture Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.