• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पनवेलमध्ये २४ दिवस २४ कलाकारांची वादन कला सादर

by Mayuresh Patnakar
August 31, 2026
in Maharashtra
20 1
0
Musical art will be presented in Panvel
40
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्राचीन विरुपाक्ष मंदिरात श्रावण मासानिमित्ताने वादन सेवेचे आयोजन

गुहागर, ता. 31 : पनवेलमध्ये श्रावण मासानिमित्त विविध उपक्रम नेहमीच आयोजित केले जातात. यंदा एक विशेष उपक्रम पनवेलमधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर येथे होत आहे. विरुपाक्ष देवस्थान ट्रस्टचे सचिव गुरुनाथ उर्फ संदीप लोंढे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा उपक्रम म्हणजे १३ ऑगस्ट श्रावण मास प्रारंभ ते १० सप्टेंबर रोज (श्रावण सोमवार सोडून)  वादन सेवा. या उपक्रमातुन २४ हुन अधिक कलाकार आपली कला महादेवांच्या समोर सादर करत आहेत. रोज एका कलाकाराचे वादन त्यामध्ये सनई, संवादिनी, तबला, पखवाज, सतार, संतूर, व्हायोलिन, बासरी अशी वाद्ये वाजवणारे कलाकार समाविष्ट आहेत. Musical art will be presented in Panvel

या पूर्ण कार्यक्रमाची आखणी, नियोजन हे किरण बापट यांनी केलं आहे. देवस्थानचे अध्यक्ष श्रीनंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू आहे आणि ट्रस्टचे सर्व सदस्य यामध्ये मोलाचे योगदान देत आहेत. ह्या उपक्रमाचा उद्देश हा नवीन वादक कलाकार पुढे यावेत आणि त्यांना योग्य त्या संधी मिळाव्यात असा आहे. या उपक्रमाचा सांगता सोहळा १० सप्टेंबर रोजी विशेष मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे. Musical art will be presented in Panvel

संगीत रसिकांनी आवर्जून या पूर्ण महिनाभर चालणाऱ्या वादन सेवेला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती. वादन सेवेची वेळ ही संध्याकाळी ७ ते ७.३० अशी आहे. Musical art will be presented in Panvel

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMusical art will be presented in PanvelNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.