२१ शाळांकडून नवीन शेड उभारणीची मागणी
गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या ‘शालेय पोषण आहारा ‘च्या स्वच्छतेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वयंपाकघर नसल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांच्या व्हरांड्यात, उघड्यावर किंवा जुन्या पडक्या खोल्यांमध्येच विद्यार्थ्यांचे जेवण शिजवले जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नवीन किचन शेड उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. School kitchen sheds in disrepair
यामध्ये गुहागर तालुक्यातील एकूण २०९ पैकी २१ शाळांनी नवीन किचन शेड उभारणीची तर १२४ शाळांनी किचन शेड दुरुस्तीची मागणी केली असल्याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शालेय आहाराची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासण्याची मोहीम राज्यभर तीव्र करण्यात आली आहे. नियमानुसार, पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १२ ग्रॅम प्रथिने मिळण्यासाठी १०० ग्रॅम तांदूळ व पूरक आहार, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २० ग्रॅम प्रथिने मिळण्यासाठी १५० ग्रॅम तांदूळ दिला जातो. School kitchen sheds in disrepair
मात्र, रत्नागिरीत शेकडो शाळांमध्ये हे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नाही आणि शिजवण्यासाठी किचन शेड नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ७१२ शाळा असून, त्यापैकी तब्बल ४०० शाळांना स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्धच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नवीन किचन शेड उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. शिक्षण विभाग आणि अन्न व औषध विभागाने संयुक्तपणे यावर उपाययोजना करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांमधून केली जात आहे. School kitchen sheds in disrepair
