उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल; ‘शिस्तबद्ध संघ’ पुरस्काराने गौरव
रत्नागिरी, ता. 28 : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या ११व्या महाराष्ट्र राज्य सिनियर व ८व्या मिनी सब-ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत (क्वार्टर फायनल) मजल मारली. महाराष्ट्रातील सुमारे 80 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. Ratnagiri team reaches the quarterfinals
उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात रत्नागिरी संघाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, स्पर्धेतील शिस्तबद्ध खेळ, सांघिक भावना आणि उत्कृष्ट क्रीडाभावनेबद्दल रत्नागिरी संघाला ‘शिस्तबद्ध संघ’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. योगिता खाडे आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या या संघाचे नेतृत्व स्वानंद देवस्थळी यांनी, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी चैतन्य शेट्ये यांनी सांभाळली. Ratnagiri team reaches the quarterfinals
संघात अनुज कारकर, आर्यन संसारे, विहान देवळेकर, रोहन रसाळे, कवी संसारे, अनय शेट्ये, मंथन कदम, अद्वैत धवळ, अथर्व नागले, श्रीश सुर्वे, युवराज वीर व मंगेश सकपाळ यांचा समावेश होता. सुजल पवार यांनी टीम मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पाडली.
संघाच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव महंमद बाबर, रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश मयेकर, उपाध्यक्ष खलील भाई दलवाई, मंगेशजी माटे, सचिव व प्रमुख प्रशिक्षिका डॉ. योगिता खाडे आयरे, अॅड. संकेतजी साळवी, ओमकार संसारे, प्रणित सावंत, शशिकांत उदेग तसेच संघातील सर्व खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात आले. Ratnagiri team reaches the quarterfinals
