गुहागर, ता. 27 : तालुक्यातील हेदवी येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 या इमारतीचे काम गेली दोन वर्ष रखडले आहे. इमारतीचे काम 40 टक्के झाले आहे. मात्र ठेकेदाराला तब्बल 70 टक्के पेमेंट केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या अजब प्रकारामुळे ठेकेदार व प्रशासकीय चौकशी होणे गरजेचे आहे. Work at Hedvi Veterinary Hospital stalled
गुहागर तालुक्यातील हेदवी येथील या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामांमधील अजब प्रकारामुळे केवळ ठेकेदारासाठीच हे काम म्हणजे एक प्रकारे कुरण ठरले आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून सन 2023-24 मध्ये या दवाखान्यासाठी 17 लाख 75 हजार 500 रुपये अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर झाली. तर 13 लाख 62 हजार 675 रुपये ही निविदा रक्कम एक टक्का बिलोने सावर्डे येथील चेअरमन केदारनाथ मजूर सहकारी संस्था यांच्या नावावर हे काम देण्यात आले आहे. मार्च 2025 मध्ये सदर काम पूर्ण करावयाचे होते. मात्र सध्याची वस्तुस्ती पाहता सदर काम 50% पेक्षा जास्त पूर्ण होणे शिल्लक आहे. झालेले कामही दर्जाहीन झाल्याचे दिसून येत आहे. Work at Hedvi Veterinary Hospital stalled
या इमारतीचे उंची वाढवून त्यावर स्टील पत्राचे स्ट्रक्चर उभे करून संपूर्ण इमारतीचे जुने प्लास्टर पाडून नवीन प्लास्टर करावयाचे आहे. या संपूर्ण इमारतीला लादी, स्लाइडिंग खिडक्या ग्रील बाहेर 63 क्युबिक मीटर पेवर ब्लॉक अशा कामांचा सहमावेश आहे. दर्जाहीन काम दरम्यान गेली दोन वर्ष रखडलेल्या या कामाची अवस्था पाहता यावर जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयाच्या तात्कालीन अभियंताने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. इमारतीची उंची वाढवण्या अगोदर दरवाजे व खिडकी यांच्यावर काँक्रीटची रिंग घेणे आवश्यक होते. मात्र या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने तयार काँक्रीट लेंटर आणून त्यावर बांधकाम केले आहे. मुख्य दरवाजाचे कडप्याचे काम केलेले. जुने प्लास्टर न काढता आहे त्या प्लास्टर ला जोडून काही ठिकाणी काम केले आहे. Work at Hedvi Veterinary Hospital stalled
टाकलेल्या पत्रासाठी तब्बल साडेतीन टन स्टील वापरायचे आहे. यामध्ये 5X 3 इंच आयबीम वापरायचे होते त्या ठिकाणी चार बाय तीन चे आयबीएम वापरले गेले आहेत. हे एवढेच साधारण 30 ते 40% च काम झाले आहे. मात्र केलेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचेही दिसून येत आहे. काम 40% बिल मात्र 70 % जिल्हा परिषद बांधकाम तात्कालीन अभियंता व ठेकेदार यांचा अजब प्रकार या काढलेल्या पेमेंट वरून दिसून येते 13 लाख 62 हजार 675 ही निविदा रक्कम असून काम न करताच 15 मे 2025 रोजी संबंधित ठेकेदाराला 09 लाख 51 हजार 579 रुपये रक्कम देण्यात आली आहे. Work at Hedvi Veterinary Hospital stalled
यामुळे या कामाचे तात्काळ मूल्यांकन करून अंतर्गत झालेला हा एक प्रकारे भ्रष्टाचारच आहे. ग्रामपंचायतीला कोणतीच कल्पना नाही निर्मल ग्रामपंचायत हेदवीच्या सरपंच आर्या मोरे यांच्याजवळ गावातील या कामाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर कामाबाबत ना बांधकाम विभाग ना ठेकेदार यांनी कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही. प्रभाग समितीच्या बैठकीमधून रखडलेला कामाचा हा विषय पुढे आल्यावर सदर काम पूर्णपणे अर्धवट असल्याचे समोर आले आहे. गळक्या इमारती मधून सुरू आहे पशुवैद्यकीय दवाखाना गेली दोन वर्ष मुख्य पशुवैद्यकीय दवाखान्यच्या कामाच्या नावावर या इमारती शेजारी असलेल्या गळक्या इमारतीमधून पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम सुरू आहे. इमारतीमध्ये छप्पर केव्हाही अंगावर कोसळेल अशी दयनीय अवस्था असून दवाखान्यातील औषधांचा साठा प्लास्टिकचे आवरण टाकून गळक्या इमारतीपासून बचाव केला जात आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुहागर पंचायत समिती जिल्हा परिषद विभागाला तसेच सभापती यांच्याकडे सदर अर्धवट कामाबाबत पत्रव्यवहार केला आहे. आता या कामाकडे गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे लक्ष देतील का असा सवाल पुढे येत आहे. काम न करताच काढलेल्या बिलाची काय इमारतीचे काम 50% पेक्षा जास्त होण्याअगोदरच सुमारे 70% पेक्षा जास्त रक्कम बिलापोटी काढण्यात आली आहे यामुळे तात्कालीन अभियंता व उपअभियंता यांच्यावर आता कोणती कारवाई होते याकडेही हेदवी वासीयांचे लक्ष लागले आहे. Work at Hedvi Veterinary Hospital stalled
