• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी रस्त्यात मोकाट जनावरांचा ठिय्या

by Mayuresh Patnakar
August 14, 2026
in Guhagar
74 1
0
Stray animals on Shringartali road
146
SHARES
418
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अपघाताला निमंत्रण; पथदीप बंद असल्याने धोका अधिक

गुहागर, ता. 14 : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये रस्त्यामध्ये रात्री जनावरे ठिय्या मांडत असल्याने वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे. त्यातच येथील पथदीप बंद असल्याने या समस्येने अधिक गंभीर स्वरुप धारण केले आहे. Stray animals on Shringartali road

गुहागर तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या शृंगारतळी येथे रात्री मोठ्या संख्येने गायी, बैल भर रस्त्यात ठाण मांडतात. दिवसभर ही जनावरे कमी प्रमाणात असतात मात्र रात्री आबलोली फाटा, शृंगारतळी चेक पोस्ट, पालपेणे फाटा, वेळंब फाटा येथे जनावरांचा ठिय्या असतो. वाहनांनी हॉर्न कितीही वाजवले तरी यावर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे वाहनचालक त्रस्त असताना सदर मोकाट जनावरांवर उपाययोजना करण्यामध्ये तालुक्याचे प्रशासन कुचकामी ठरले आहे. केवळ अपघात झाला की पंचनामा व नोंद करण्याची जबाबदारी प्रशासन पार पाडत आहे. Stray animals on Shringartali road

शृंगारतळी बाजारपेठेमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बसवलेले सर्व पथदीप गेले काही महिने बंद आहेत. ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी अनेकवेळा पथदीप सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडे संपर्क साधला. मात्र याकडे संबंधित विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे रस्त्यावरील काळोखात जनावरांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे धोकादायक ठरलेल्या या महामार्गावर बंद पथदीप अधिक भर टाकत आहेत. दरम्यान, शृंगारतळी येथील मोकाट जनावरांचा प्रश्न जनावरांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस जटील होत आहे. यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केलेले प्रयत्नही अपुरे ठरले आहेत. यामुळे आता कठोर कार्यवाही करणे गरजेचे बनले असून जनावरांमुळे प्रशासन मनुष्यबळीची प्रतीक्षा करत आहे. Stray animals on Shringartali road

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStray animals on Shringartali roadटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet37
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.