गुहागर, ता. 12 : तालुक्यातील झोंबडी गावचे सरपंच आणि गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुलशेठ लांजेकर यांची शृंगारतळी जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुखपदी आमदार भास्करशेठ जाधव यांनी चिपळूण येथील पक्ष कार्यालयात नियुक्ती जाहीर केली. Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar
अतिशय नम्र आणि लोकांची कामे करणारे कार्यकर्ते म्हणून अतुलशेठ लांजेकर यांची ख्याती आहे. त्यांचा जनसपंर्क दांडका असून संघटना वाढीसाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन ते विकास कामे करतात. अतुलशेठ लांजेकर यांच्या नियुक्तीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात आणि शृंगारतळी जिल्हा परिषद गटात जल्लोष साजरा करण्यात येत असून अतुलशेठ लांजेकर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar
आमदार भास्करशेठ जाधव यांनी अतुलशेठ लांजेकर यांना नियुक्ती पत्र देऊन हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणे आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे काम आपल्या हातून घडो अशा शुभेच्छाही आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिल्या. Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar
यावेळी जिल्हा प्रमुख विक्रांतदादा जाधव, तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत, जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळ्ये, खेड तालुका प्रमुख अंकुश काते, सरपंच शैलेश साळवी, समीक्षा बारगुडे, मंगेश सोलकर, जयदेव मोरे, साक्षी चव्हाण मधुकर सावंत, स्वप्निल बारगुडे, चिपळूण तालुका प्रमुख सुभाष जाधव, चिपळूण पंचायत समिती गट नेते गौरव पाटेकर, फैसल कासकर, फैय्याज शिरळकर, नंदू चव्हाण यांचेसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar
