• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खाऊच्या पैशातून विद्यार्थी बचत बॅंक

by Mayuresh Patnakar
August 12, 2026
in Guhagar
39 0
0
Student Savings Bank
76
SHARES
217
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोळवली भुवडवाडी शाळेचा अभिनव उपक्रम

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील भातगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवली भुवडवाडी शाळेने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत “विद्यार्थी बचत बॅंकेची ” स्थापना केली आहे. या अभिनव उपक्रमाचे कोळवली पंचक्रोशीतून स्वागत करण्यात येत आहे. Student Savings Bank

 ही अतिशय दुर्गम ग्रामीण भागातील आहे.  शालेय जीवनात बचतीची सवय लागावी, बॅंकेचे आर्थिक व्यवहार कळावेत, खाऊचे पैसे साठवून भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हातभार लागावा या उदात्त हेतूने शाळा व्यवस्थापन समितीने एक चांगला निर्णय घेऊन तो प्रत्यक्ष अमलात आणला. सदर नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविण्यासाठी शाळेचे शिक्षक सतिश विचारे  व मुख्याध्यापक श्री रविंद्र कुळये यांनी प्रयत्न केले. Student Savings Bank

या उपक्रमाचे गावचे सरपंच  संतोष सावरकर, ग्रामसेवक सुनील कदम, उपसरपंच अजित भूवड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. खुशी सचिन हुमणे, उपाध्यक्ष निताली नितीन भुवड, सत्यवान हुमणे, अभि लिंगायत, पाणी कमिटी अध्यक्ष संदिप ठोंबरे यांनी कौतूक केले आहे. शाळा स्थापनेपासून प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेने राबविल्या बद्दल शिक्षकांचे विशेष कौतुक केले. Student Savings Bank

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStudent Savings Bankटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share30SendTweet19
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.