• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत ‘खेलो इंडिया’ बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी

by Mayuresh Patnakar
August 11, 2026
in Ratnagiri
31 0
1
60
SHARES
172
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

​रत्नागिरी, ता. 11: जिल्ह्यातील १० ते १४ वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. जिल्हा क्रीडा संकुलात मंजूर झालेल्या ‘जिल्हास्तर खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रा’साठी येत्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या चाचणीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. Badminton training in Ratnagiri

​राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका खेळासाठी ‘खेलो इंडिया’ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत असून, रत्नागिरी जिल्ह्याला बॅडमिंटन या खेळासाठी मान्यता मिळाली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. Badminton training in Ratnagiri

ही निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, मारुती मंदिर (रत्नागिरी) येथे पार पडेल. या केंद्रासाठी १० ते १४ वयोगटातील एकूण ३० खेळाडूंची निवड केली जाणार असून, यामध्ये १५ मुले आणि १५ मुलींचा समावेश असेल.​​चाचणीसाठी येताना सर्व खेळाडूंनी स्वतःचा जन्माचा दाखला आणि आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. ​खेळाडूंनी खालील लिंकवर आपली पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे:

https://docs.google.com/forms/d/e/9FAIpQLSCTL१७AYGjOCLuqBDANOWYktby2KM९W७Evy-IAgAKPVC_Fw/viewform?usp=header

​निवड झालेल्या खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा:

या प्रशिक्षण केंद्रासाठी अंतिम निवड झालेल्या सर्व खेळाडूंना शासनातर्फे क्रीडा गणवेश आणि आवश्यक क्रीडा साहित्य मोफत दिले जाणार आहे. या केंद्रातील सराव सोमवार ते शनिवार सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत नियमितपणे सुरू राहील. ​या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा क्रीडा कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे (मो. नं. ९२८४३४२२१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. Badminton training in Ratnagiri

Tags: Badminton training in RatnagiriGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.