शिक्षण विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम; शिक्षकांच्या विषय समित्या होणार स्थापन
पुणे, ता. 08 : राज्यातील सहावी ते बारावी या इयत्तांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या व्हॉटस्अॅप समूहाद्वारे विषय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्याद्वारे गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, अध्ययन, अध्यापन साहित्य, चित्रफीत निर्मिती, करिअर मार्गदर्शन याबाबत शिक्षकांशी संवाद साधला जाणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. Improving educational quality through WhatsApp
शिक्षकांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर विषय समित्या स्थापन करण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हास्तरावर विविध विषय शिक्षकांच्या समित्या स्थापन केल्या आहेत. विषय समित्यांमध्ये कृतिशील, समर्पितपणे काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश करावा. जिल्हा समित्यांमार्फत गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवावेत. तसेच चाचणीद्वारे इयत्ता व विषयनिहाय अध्ययनस्तर निश्चित करण्यात यावा. माध्यमिक स्तरावर सहावी ते दहावी या इयत्तांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांच्या समित्या स्थापन कराव्यात, उच्च माध्यमिक स्तरासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इतिहास, बुक कीपिंग अॅड. अकाऊंटन्सी, अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश असेल. Improving educational quality through WhatsApp
या समित्यांच्या माध्यमातून अध्यापनासाठी आवश्यक अध्ययन अध्यापन, साहित्य, शैक्षणिक चित्रफितींची निर्मिती, करिअर मार्गदर्शनासंबंधी उपक्रम राबविणे याबाबत शिक्षण आयुक्त यूट्यूबद्वारे संवाद साधणार आहेत. राज्यस्तरावर व्हॉटस्अॅप गट स्थापन केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयाचे उत्कृष्ट, उपक्रमशील आणि नवोपक्रमशील किमान पाच विषय शिक्षकांचा समावेश करावा, तसेच जिल्हा स्तरावर स्थापन करण्या आलेल्या विषय समित्यांचा अहवाल शिक्षण संचालनालयाला सादर करावा, असे निर्देश आहेत. Improving educational quality through WhatsApp
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी या समित्यांच्या माध्यमातून अध्यापनासाठी आवश्यक अध्ययन अध्यापन, साहित्य, शैक्षणिक चित्रफितींची निर्मीती, करिअर मार्गदर्शनासंबंधी उपक्रम राबवणे याबाबत शिक्षण आयुक्त यूट्यूबद्वारे संवाद साधणार आहेत. राज्यस्तरावर व्हॉटस्अॅप गट स्थापन केला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होईल. Improving educational quality through WhatsApp