दि. १२ आणि १४ ऑगस्ट रोजी राबविली जाणार प्रक्रिया; ऑनलाइन फी भरणे अनिवार्य
रत्नागिरी, ता. 07 : कॅप (CAP) च्या चौथ्या प्रवेश फेरीअखेर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा) अभ्यासक्रमांसाठी ‘ऑन-द-स्पॉट’ (Spot Round) प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया १२ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयात प्रत्यक्ष पार पडेल, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे यांनी दिली. Admission round for vacant seats in Ratnagiri
या फेरीसाठी पात्र असलेले सर्व विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. मात्र, केवळ काउन्सेलिंग फेरीला उपस्थित राहिल्याने प्रवेशाची हमी मिळणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका या दोन्ही गटांसाठी ही प्रक्रिया एकाच वेळापत्रकानुसार राबवली जाईल. नोंदणीची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंत, तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List): दुपारी १ वाजता, तक्रारी / हरकती नोंदवणे: दुपारी १:०० ते २:३० वाजेपर्यंत, अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List): दुपारी ३ वाजता, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात: दुपारी ३:३० वाजल्यानंतर होईल. Admission round for vacant seats in Ratnagiri
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि अटी:
कागदपत्रे: प्रवेशासाठी येताना उमेदवारांनी आपली ‘FC (CAP/Non-CAP) मान्यता पावती’, सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे अत्यंत अनिवार्य आहे.
प्रवेश निश्चिती: सर्व मूळ प्रमाणपत्रांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर आणि आवश्यक शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम मानला जाईल.
शुल्क भरण्याची पद्धत: प्रवेशाचे शुल्क रोखीने न स्वीकारता केवळ ऑनलाइन माध्यमातूनच (Online Payment) स्वीकारले जाईल.
प्रवेश रद्द करणे: ज्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश पूर्ण फी परताव्यासह (Full Refund) रद्द करायचा आहे, त्यांच्यासाठी १२ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत असणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती, रिक्त जागांचा तपशील आणि अद्ययावत सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या www.gpratnagiri.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Admission round for vacant seats in Ratnagiri