• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रमोद गांधी यांनी दिला दोडवली शाळेला लॅपटॉप भेट

by Mayuresh Patnakar
August 6, 2026
in Guhagar
50 0
0
Laptop gift to Dodavali school
97
SHARES
278
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील दोडवली शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोद गांधी यांनी शाळेला डेल कंपनीचा सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप भेट देऊन विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला हातभार लावला. या योगदानाबद्दल शाळा, ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. Laptop gift to Dodavali school

Laptop gift to Dodavali school

याच कार्यक्रमात श्री. अशोक यशवंत कांबळे व सौ. अक्षता अशोक कांबळे यांच्या विवाहाला ११ मे २०२६ रोजी २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले. तसेच विद्यार्थ्यांना जेवणासाठी डिश, शैक्षणिक साहित्य (पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर), स्पोर्ट्स टी-शर्ट तसेच शाळेसाठी विविध स्टेशनरी साहित्य भेट देण्यात आले. Laptop gift to Dodavali school

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास श्री. अशोक कांबळे, सौ. अक्षता कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रदीप जाधव, उपाध्यक्षा सौ. तृप्ती कांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय हुमणे, ज्येष्ठ नागरिक श्री. दामोदर कांबळे, श्री. दिनेश कांबळे, श्री. सुरज कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. Laptop gift to Dodavali school

Tags: GuhagarGuhagar NewsLaptop gift to Dodavali schoolLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share39SendTweet24
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.