पूजा, गौरव सोहळा, कीर्तन व भजनाचा कार्यक्रम
गुहागर, ता. 04 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ, गुहागर यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी उत्सवानिमित्त सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात संपन्न होणार आहे. Sant Namdev Maharaj Festival
यावेळी सकाळी ८ ते १० या वेळेत श्री संत नामदेव महाराज व श्री सत्यनारायणाची पूजा होईल. त्यानंतर सकाळी ११ ते १२ या वेळेत गौरव सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ ते १.१५ या वेळेत ह.भ.प. सो. मनाली मनोज बावधनकर यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हळदीकुंकू समारंभ तसेच श्री काळभैरव भजन मंडळ, वेळणेश्वर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. Sant Namdev Maharaj Festival
या उत्सवासाठी प्रसिद्ध व्यापारी श्री. लक्ष्मण अनंत खांडके, गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. निता विकास मालप आणि श्री देव व्याडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शार्दूल सुधन्वा भावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळाने सर्व भाविक व नागरिकांनी या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन केले आहे. Sant Namdev Maharaj Festival

