महसूल विभागाच्या कामकाजाचा घेणार आढावा
रत्नागिरी, ता. 01 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविवार, दि. 2 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध शासकीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेत निवेदने स्वीकारण्याबरोबरच महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावाही घेणार आहेत. Chandrashekhar on Bawankule district tour
दौऱ्याची सुरुवात सकाळी 10 वाजता रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमात मंत्री बावनकुळे उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत. यानंतर दुपारी 12 वाजता रघुनाथ पांडे यांच्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथेही वेळ राखीव आहे. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या समवेत महसूल विभाग, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग तसेच भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. Chandrashekhar on Bawankule district tour
या बैठकीत विविध प्रलंबित विषय, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. यानंतर दुपारी 3.30 वाजता कार्यक्रमासाठी वेळ राखीव ठेवण्यात आली असून त्यानंतर दौरा संपन्न होणार आहे. Chandrashekhar on Bawankule district tour
