• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेपरफुटीविरोधी नव्या कायद्याला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

by Manoj Bavdhankar
July 25, 2026
in Bharat
16 0
0
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास, ₹१० कोटी दंड; पुढील आठवड्यात संसदेत विधेयक

नवी दिल्ली, ता. 25 : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असताना केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या कायद्याला मंजुरी दिली असून, पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडून मंजूर करण्याची तयारी सुरू आहे. प्रस्तावित कायद्यानुसार पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना १० वर्षांपर्यंत कारावास आणि ₹१० कोटींपर्यंत दंड अशी कठोर शिक्षा करण्याची तरतूद असेल. Union Cabinet approves new law against paper leaks.

दरम्यान, नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला विविध विद्यार्थी व पालकांचा पाठिंबा मिळत आहे. उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनंतर उपोषण मागे घेतले असले, तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून संसदेतही विरोधक आक्रमक झाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. Union Cabinet approves new law against paper leaks.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUnion Cabinet approves new law against paper leaks.टॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.