नरवण, बोऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गुहागर : राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने मंगळवारी गुहागर तालुक्यातील मोठी कारवाई केली. नरवण येथे 6 लाख 82 हजार 976 रुपयांची तर बोऱ्यामध्ये 64 हजार 584 असा एकूण साडेसात लाखांचा मद्य साठा जप्त केला आहे. या कारवाईने तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे दाबे दणाणले आहेत.
The state excise Ratnagiri department on Tuesday took major action in Guhagar taluka. The illegal Stock of Alcohol confiscated from Naravan of Rs. 6 lakh 82 thousand 976 rupees in Narwan and 64 thousand 584 rupees From Borya. This action has put pressure on the illegal traders in the taluka.
गुहागर तालुव्यातील नरवण येथे विभागीय उपआयुक्त वाय. एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामिण व राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरी विभागाने छापा टाकून 7 लाख 47 हजार 560 रू. किमतीच गोवा बनावट विदेशी मद्य साठा जप्त केला. यावेळी गोवा बनावट गोल्डन एस हारकीच 25 बॉक्स, महाराष्ट्र बनावटीच्या 1 ऑक्स,180 लि. गावठी दारू व 1 नंबरप्लेट नसलेनी स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 6 लाख 82 हजार 976 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी नितेश दिनेश आरेकर (वय 32) रा. नरवण ता. गुहागर जि. रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश आरेकर याने गोवा बनावट मदयाचे काही बॉक्स घरचे बाजूस गोट्यात तर गावठी दारू व काही बॉक्स स्विफ्ट डिझायर कारमध्ये ठेवले होते.
यानंतर तालुक्यातील बो-या येथे कारवाई करून गोल्डन एस व्हीस्कीचे बॅाक्स, मॅक्डॉल 1 व्हिस्को, हाय्वर्डस व्हिस्की, डिएसपी ब्लॅक असा एकूण 64 हजार 584 रू.किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर (वय 42) रा. कोंडकारूळ बो-या ता. गुहागर जि. रत्नागिरी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई निरीक्षक शरद जाधव, दुययम निरीक्षक सत्यवान भगत, किरण पाटील, स. दु. नि. विजय हातोसकर, जवान सागर पवार, दत्तप्रसाद कालेलकर, विशाल विचारे, नहिला जबान, अनिता नागरगोजे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. दरम्यान, गुहागर तालुक्यात यापुढेही याच पध्दतीने बनावट व गावठी दारूधंदयावर कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्र. अधिक्षक वैभव वैदय यांनी दिला आहे.