सागरी जैवविविधतेचा वैशिष्ट्यपूर्ण ठेवा समुद्रप्रेमी, पर्यावरण अभ्यासक, स्थानिकांचे वेधले लक्ष
गुहागर, ता. 24 : दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर नुकताच दुर्मिळ सुरी शिंपला’ (रेझर क्लाम) आढळून आल्याने सागरी जैवविविधतेचा एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा पुन्हा एकदा समोर आला आहे. लांबट, सुरीच्या पात्यासारखा आकार असलेल्या या शिंपल्याने समुद्रप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. Knife mussel found on Harne beach
हर्णै किनारपट्टीवरील समृद्ध सागरी जीवसृष्टीचा हा आणखी एक महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. सुरी शिंपला हा द्विपट कवच (बीव्हालव्हे) प्रकारातील सागरी जीव असून त्याचे कवच लांब, अरुंद आणि सरळ असते. साधारणतः १० ते २० सेंटीमीटर लांबीचा हा शिंपला फिकट तपकिरी, पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाचा असतो. त्याच्या शरीररचनेमुळे तो समुद्रकिनाऱ्यावरील मऊ वाळूमध्ये अतिशय वेगाने खोलवर शिरू शकतो. त्यामुळे हा शिंपला प्रत्यक्ष पाहणे फारच दुर्मिळ मानले जाते. Knife mussel found on Harne beach
पर्यावरणप्रेमींनी हर्णै समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या या दुर्मिळ शिंपल्याच्या नोंदीचे स्वागत केले असून अशा सागरी जीवांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली आहे. किनारपट्टीवरील प्रदूषण रोखणे, अनधिकृत वाळू उपशावर नियंत्रण ठेवणे आणि सागरी अधिवासाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्यांचे मत त्यांनी व्यक्त केले. हर्णे समुद्रकिना-यावर आढळलेला हा दुर्मिळ सुरी शिंपला केवळ एक सागरी जीव नसून कोकणच्या समृद्ध जैवविविधतेचे जैवविविधतेचे प्रतिक प्रतिक आहे. अशा दुर्मिळ जीवांच्या जीवांच्या नोंदीमुळे सागरी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून भविष्यात या जैवसंपदेच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेक देशांमध्ये या शिंपल्याचा खाद्यपदार्थ म्हणूनही उपयोग केला जातो. तो भरती-ओहोटीच्या पट्ट्यातील वाळूमध्ये राहातो. तो समुद्रातील सूक्ष्म प्लवक आणि सेंद्रिय कण पाण्यातून गाळून खात असल्याने समुद्रातील पाणी स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तो केवळ एक सागरी जीव नसून किनारी परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक मानला जातो. Knife mussel found on Harne beach
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, सुरी शिंपल्यांची संख्या अनेक किनारपट्ट्यांवर घटत आहे. अतिरिक्त शिकार, किनारपट्टीवरील वाढते प्रदूषण, अनियंत्रित वाळू उपसा आणि नैसर्गिक अधिवासाचा हास ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे काही भागांत हा शिंपला दुर्मिळ प्रजाती म्हणून ओळखला जातो. कोकण किनारपट्टी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून हर्णै परिसरात यापूर्वी डॉल्फिन, ऑलिव्ह रिडले कासव, विविध प्रकारचे समुद्री पक्षी आणि दुर्मिळ सागरी जीव आढळले आहेत. त्यात आता सुरी शिंपल्याची भर पडल्याने या परिसरातील सागरी परिसंस्था अधिक समृद्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे. Knife mussel found on Harne beach
