पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार दोन वर्षांसाठी नियुक्ती
रत्नागिरी, ता. 21 : जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. Appointment of members to the Hilly Areas Committee
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार रविंद्र महादेव नागरेकर (शीळ, ता. राजापूर), दिलीप श्रीपत राणे (तुळशी, ता. खेड) आणि सुलोचना दशरथ कोंबकर (वाल्मिकीनगर, ता. मंडणगड) यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Appointment of members to the Hilly Areas Committee
जिल्ह्यातील मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर हे तालुके ‘पूर्णगट’ तर दापोली आणि गुहागर हे तालुके ‘उपगट’ म्हणून डोंगरी भाग विकास कार्यक्रमात समाविष्ट आहेत. या भागातील विकासकामांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे.
समितीत डोंगरी भागातील आमदार, अशासकीय सदस्य, महिला सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांचा समावेश आहे. नवनियुक्त सदस्यांची नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील दोन वर्षे किंवा नियुक्ती रद्द होईपर्यंत लागू राहणार आहे. Appointment of members to the Hilly Areas Committee