भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
रत्नागिरी, ता. 17 : खरीप हंगाम २०२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून आता केवळ १५ दिवस शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. Crop Insurance Scheme
रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांमध्ये भात व नाचणी पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी तसेच भाडेपट्टीवरील शेतकरीही योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र, ‘अॅग्रीस्टॅक’ शेतकरी ओळख क्रमांक आणि ‘ई-पीक पाहणी’ नोंद अनिवार्य आहे. Crop Insurance Scheme
शेतकऱ्यांचा विमा हप्ता केवळ २ टक्के असून भातासाठी हेक्टरी ६,५०० रुपये, तर नाचणीसाठी हेक्टरी ४,००० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. शेतकरी बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार सेवा केंद्र किंवा PMFBY पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. कृषी विभागाने अधिकाधिक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. Crop Insurance Scheme
